Akola News : भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय आणि केंद्रीय शेळी संशोधन संस्था (मथुरा) यांच्या संयुक्त विद्यमाने आग्रा (उत्तर प्रदेश) येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील शेळी उत्पादक राजरत्न वानखडे यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाचे सचिव अलका उपाध्याय, पशुसंवर्धन आयुक्त, डॉ. अभिजित मित्रा, उपमहासंचालक (ICAR पशुसंवर्धन) डॉ. राघवेंद्र भट्ट, सहायक महासंचालक (पशुसंवर्धन, उत्तर प्रदेश)
डॉ. ज्ञानेंद्रकुमार गौड, डॉ. पी. एन. सिंग, केंद्रीय शेळी संशोधन संस्थेचे संचालक डॉ. मनीषकुमार चेतलीर, केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्थेचे संचालक डॉ. तोमर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी,
देशातील विविध राज्यांतील प्रगतिशील शेळ्या-मेंढी उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमात शेळी-मेंढी पालनासंबंधी विविध योजनांवर चर्चा करण्यात आली.
या वेळी अकोल्यातील वानखडे यांना कार्यक्रमात प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. वानखडे हे गेल्या पाच वर्षांपासून बेरारी शेळी पैदासकार संघटनेसाठी काम करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.