Agriculture News  Agrowon
ॲग्रो विशेष

Krishi Sahayyak : कृषी सहायकांच्या समस्यांवर पुण्यातील बैठकीत चर्चा

Team Agrowon

Akola News : महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेची राज्यस्तरीय आढावा बैठक रविवारी (ता. २२) पुण्यात झाली. या बैठकीत कृषी सहायकांच्या विविध समस्या, प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली. या बाबत कृषी आयुक्तस्तरावर लवकरच पाठपुरावा करण्याबाबत ठरवण्यात आले.

या बैठकीला राज्यातील विविध जिल्ह्यांतून राज्य कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव उपस्थित होते. राज्याचे सरचिटणीस सोमनाथ बाचकर यांची कृषी पर्यवेक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. आजवर त्यांनी कृषी सहायक संघटनेत आघाडीवर काम केले.

त्यांचे संघटनेसाठीचे योगदान पाहता ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही, अशा भावना या वेळी अनेकांनी आपल्या मनोगतात मांडल्या. अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष संदीप बोदगे यांचाही पदोन्नतीबद्दल सत्कार करण्यात आला.

या सभेमध्ये संघटनेच्या रिक्त पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. राज्य सरचिटणीसपदी महेंद्र गजभिये (नागपूर), सरचिटणीसपदी जय किर्तिमान पाटील (नाशिक), सह कोषाध्यक्षपदी प्रसाद पाटील (रायगड) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर कृषी सहायकांच्या विविध अडचणींवर चर्चा झाली.

या वेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप केवटे, शरद सुरळकर, वसंत जरीकोटे, उमेश मोहिते, स्वाती झावरे, अंजना सोनवलकर, शांताराम कसबे, प्रवीण ठाकरे, अनिल भोई, प्रशांत दोरगे, स्वप्नील भुजबळ, योगिता माने, भगत, जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Productivity : डाळिंब केंद्राच्या विविध तंत्रज्ञानाचा वापर करत उत्पादकता वाढवावी

Grapefruit : मुरूडला पपनसाच्या उत्‍पादनात घट

Farmers Issue : सरकारकडून शेतकऱ्यांच्या मानसिक खच्चीकरणाचे काम

Crop Damage : पाऊस थांबेना, डोळ्यांदेखत सोयाबीन पाण्यात

Agriculture Mortgage Scheme : लासलगाव बाजार समितीत शेतीमाल तारण कर्ज योजना सुरू

SCROLL FOR NEXT