Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : रब्बी पेरणीसाठी ४७ हजार क्विंटल बियाण्याची मागणी

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यात यंदाच्या (२०२४-२५) रब्बी हंगामात २ लाख ६९ हजार २०५ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे, खते आदी निविष्ठा उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

यंदाच्या रब्बीसाठी विविध पिकांच्या ४७ हजार ९९९ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे.रब्बीसाठी मंजूर साठ्यानुसार विविध ग्रेडची १ लाख ६ हजार १५० टन खते उपलब्ध होणार अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दीपक सामाले यांनी दिली.

परभणी जिल्ह्यात गतवर्षीच्या रब्बी हंगामात (२०२३-२४) २ लाख ७० हजार २०१ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा गतवर्षीच्या तुलनेत जास्त पाऊस झाल्यामुळे रब्बीच्या पेरणी क्षेत्रात वाढ गृहित धरुन २ लाख ६९ हजार २०५ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यात ज्वारी ९६ हजार २०० हेक्टर,गहू ३० हजार हेक्टर, मका ९०० हेक्टर, हरभरा १ लाख ३९ हजार २०० हेक्टर, करडई २ हजार हेक्टर, इतर पिके ५१ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

जिल्ह्यात २०२१ ते २०२३ या तीन वर्षीच्या रब्बी हंगामात सरासरी ५८ हजार ५११ क्विंटल बियाण्याची विक्री झाली. यंदा प्रस्तावित पेरणी क्षेत्रानुसार विविध पिकांच्या ४७ हजार ९९९ क्विंटल बियाण्याची मागणी सार्वजनिक क्षेत्रातील व खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे करण्यात आली आहे.

त्यात ज्वारीचे २ हजार २२६ क्विंटल, गव्हाचे ११ हजार १०० क्विंटल, मक्याचे १३५ क्विंटल, हरभऱ्याचे ३४ हजार ४५२ क्विंटल, करडईच्या १९२ क्विंटल इतर ३ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यात महाबीजकडे १४ हजार २५० क्विंटल बिण्याची मागणी करण्यात आली त्यात ज्वारीचे १ हजार ५५० क्विंटल, गव्हाचे १ हजार १०० क्विंटल, हरभऱ्याचे ११ हजार ५०० क्विंटल, करडईचे १०० क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडे ज्वारीचे ५० क्विंटल, गव्हाचे ३०० क्विंटल, हरभऱ्याचे २ हजार ५००क्विंटल तर खासगी कंपन्यांकडे ३० हजार ८६९ क्विंटल बियाण्याची मागणी केली असून त्यात ज्वारीचे ५१६ क्विंटल, गव्हाचे ९ हजार क्विंटल, मक्याचे १३५ क्विंटल, हरभऱ्याचे २० हजार क्विंटल, करडईचे ६२ क्विंटल बियाणे आहे.

१ लाख ६ हजार टनांवर खते होणार उपलब्ध...

यंदाच्या रब्बी हंगामात ऑक्टोंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत विविध ग्रेडची १ लाख ६ हजार १५० टन खते उपलब्ध होतील. त्यात युरिया ३१ हजार टन, सिंगर सुपर फॉस्फेट ११ हजार टन, पोटॅश १ हजार टन, डीएपी २१ हजार टन, एनपीके (संयुक्त खते) ४२ हजार टन खते उपलब्ध होणार आहेत अशी माहिती एडीओ दीपक सामाले, जिल्हा कृषी अधिकारी शंकर बलशेटवाड यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : एक लाखावर शेतकरी अर्थसाह्यासाठी पात्र

Crop Damage : पावसामुळे २४ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

Crop Damage : सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान

Pik Vima Bharpai : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ८१४ कोटी रुपयांची पिकविमा भरपाई; आंबिया बहार २०२३-२४ मधील नुकसानग्रस्तांना दिलासा

Natural Farming : उत्‍पादनाच्या वाढीसाठी नैसर्गिक शेतीचा पर्याय

SCROLL FOR NEXT