Kharif and Rabi seasons Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : खानदेशात रब्बीसाठी शेती मशागतीला वेग येणार

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात शेतीकामांना मजूरटंचाईचा फटका बसत आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी शेत नापेर ठेवले व उडीद, मुगाचा हंगाम घेऊन क्षेत्र रिकामे केले, त्या शेतकऱ्यांकडून रब्बीची तयारी सुरू असून, पूर्वमशागतीस वेग येईल. त्यासाठी निरभ्र वातावरणाची प्रतीक्षा मात्र आहे.

लहान, अल्पभूधारक शेतकरी पुढे पीक लागवडीचे नियोजन करीत आहेत. खानदेशात कापसाची लागवड अधिक असते. यामुळे कापूस पिकात वेचणी झाल्यानंतर त्याखालील क्षेत्र रिकामे होईल. कापसाखालील क्षेत्र डिसेंबरमध्ये रिकामे होईल. परंतु उडीद, मूग पीक घेतलेले शेतकरी रब्बीची तयारी करीत आहेत.

शेतीच्या मशागतीसाठी पूर्वी बैलजोडीचा उपयोग अधिकचा करायचे. परंतु अलीकडे ट्रॅक्टर व अन्य यंत्रणा आली आहे. या यंत्रणेच्या मदतीने शेतकरी मशागत करून घेत आहेत. परंतु अनेक शेतांत वाफसा नाही. कारण पावसामुळे ओलावा, चिखलाची स्थिती शेतांत आहे. परंतु ऊन तापल्यास शेती मशागतीस वेग येईल.

अनेकांनी मध्यंतरी पाऊस नसताना खोल नांगरणी करून शेत तापू दिले. त्यात आता रोटाव्हेटरने शेत भुसभुशीतही केले आहे. शेत भुसभुशीत करून त्यात केळी, मका, भाजीपाला लागवडीचे नियोजन कृत्रीम जलसाठाधारक शेतकरी करीत आहेत.

जळगाव जिल्ह्यात केळी, रब्बी पिके व अन्य भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी अनेक जण गादीवाफे तयार करून घेत आहेत. नंदुरबारात केळी, मिरची, कारली, टोमॅटो व अन्य पिकेही असतात. या पिकांच्या लागवडीची तयारी या भागात झाली आहे.

खानदेशात रब्बीमध्ये हरभरा पेरणी अधिक होईल. कोरडवाहू क्षेत्रातील हरभरा काळ्या कसदार जमिनीच्या भागात अधिक असतो. तसेच दादर ज्वारीची पेरणीही होईल. यामुळे शेतकरी मशागतीच्या नियोजनात आहेत. दसरा सणापूर्वी पेरणीचे नियोजन अनेक शेतकऱ्यांनी केले आहे. यामुळे पीक जोमात येईल व क्षेत्र पुढे लवकर रिकामे होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पावसामुळे उशिरा लागवडीचे नियोजन

खानदेशात रब्बी पिकांसह केळी, मिरची आदी पिकांची आगाप लागवड केली जात होती. परंतु पाऊस यंदा अधिक आहे. त्यात पुढे आणखी पाऊस येईल, असे संकेतही आहेत. यामुळे शेतकरी सध्या उघडीप व नीरभ्र वातावरणाची प्रतीक्षा करीत आहेत. अनेकांनी गादीवाफ्यांवर मिरची व अन्य पिकांसाठी पॉली मल्चींगदेखील आणले आहे. ऑक्टोबरमध्ये भाजीपाला व अन्य पिकांची लागवड गती घेईल, असे संकेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dhananjay Munde : उद्याच कापूस आणि सोयाबीनचं अनुदान ६५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंची पुन्हा ग्वाही

Bogus Fertilizer : बोगस निविष्ठा प्रकरणात कृषी विभागाची भूमिका संशयास्पद

Cotton Productivity : सघन कापूस लागवड उत्पादकता वाढीस पूरक

Rabi Season 2024 : रब्बीसाठी तीन लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

Agriculture Awards : सरकारच्या कृषी पुरस्कार गोंधळ; शेतकऱ्यांच्या रोषानंतर कार्यक्रम सुरू

SCROLL FOR NEXT