Dr. Ravindra Shobhane Agrowon
ताज्या बातम्या

Marathi Sahitya Sammelan 2023 : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे

Latest Agriculture News : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरचे डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड झाली आहे.

Team Agrowon

Pune News : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरचे डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड झाली आहे. पुण्यात रविवारी (ता. २५) झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत संमेलनाध्यक्षपदी शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

या वेळी महामंडळाच्या कार्यवाह उज्ज्वला मेंहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पांगे, प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, डॉ. दादा गोरे, डॉ. किरण सगर, प्रा. रामचंद्र काळुंखे, प्रदीप दाते, विलास माने, विद्या देवधर, पुरुषोत्तम सप्रे, गजानन फडके आदि उपस्थित होते.

हे संमेलन साने गुरुजींच्या कर्मभूमीत अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यंदा या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी यांची नावे चर्चेत होती. अखेर शोभणे यांची बहुमताने निवड करण्यात आली. हे संमेलन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात २ ते ४ फेब्रुवारीच्या दरम्यान होण्याची शक्यता असून लवकरच कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे.

डॉ. रवींद्र शोभणे यांचे साहित्य :

अनंत जन्मांची गोष्ट (अनुवादित, मूळ हिंदी लेखक - विश्वनाथ प्रसाद तिवारी), अदृष्टाच्या वाटा (कथासंग्रह), अश्वमेध (कादंबरी, पडघम कादंबरीचा पुढचा भाग), उत्तरायण (महाभारताची मानवीय पातळीवर मांडणी करणारी कादंबरी), ऐशा चौफेर टापूत (आत्मकथन), ओल्या पापाचे फुत्कार (कथासंग्रह), कादंबरीकार श्री. ना. पेंडसे (समीक्षा ग्रंथ), कोंडी (कादंबरी), गोत्र, चंद्रोत्सव (कथासंग्रह),

चिरेबंद, जागतिकीकरण समाज आणि मराठी साहित्य (साहित्य आणि समीक्षा), तद्भव (कादंबरी), त्रिमिती (साहित्य आणि समीक्षा), दाही दिशा (कथासंग्रह), पडघम (कादंबरी), पांढर (कादंबरी), पांढरे हत्ती, प्रवाह (कादंबरी), मराठी कविता : परंपरा आणि दर्शन (संपादित), मराठी कादंबरी परंपरा आणि चिकित्सा (साहित्य आणि समीक्षा), महत्तम साधारण विभाजक (कादंबरी), महाभारत आणि मराठी कादंबरी, महाभारताचा मूल्यवेध, रक्तध्रुव (कादंबरी), वर्तमान (कथासंग्रह). शहामृग (कथासंग्रह), सत्त्वशोधाच्या दिशा (कादंबरी), संदर्भासह (साहित्य आणि समीक्षा), सव्वीस दिवस (कादंबरी).

डॉ. शोभणे यांना मिळालेले पुरस्कार

‘उत्तरायण’साठी महाराष्ट्र फाउंडेशन(अमेरिका)चा पुरस्कार, ‘उत्तरायण’साठी मारवाडी प्रतिष्ठानचा घनश्यामदास सराफ पुरस्कार, ‘उत्तरायण’साठी विदर्भ साहित्य संघाचा पू.य. देशपांडे कादंबरी पुरस्कार, सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदपदी त्‍यांनी भूषविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Installment Date : पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; बाजरीचे दर स्थिर, कोबी- मेथीचा भाव टिकून, फ्लाॅवर दर तेजीत

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

APMC SIT Investigation: नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी

Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात

SCROLL FOR NEXT