Tourism Development: राज्‍याला पर्यटनात पहिल्‍या क्रमांकावर आणणार: मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis Tourism Vision: महाबळेश्वर येथे पार पडलेल्या 'महापर्यटन उत्सव-२०२५' च्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याला पर्यटन क्षेत्रात देशात पहिल्या क्रमांकावर नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisAgrowon
Published on
Updated on

Satara News: उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक आल्यावर रोजगार निर्माण होतात. मात्र, पर्यटन क्षेत्रात कमी गुंतवणुकीत अधिक रोजगार निर्माण होतात. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्याची क्षमता या व्यवसायात आहे. पर्यटन क्षेत्रात पाचव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर येण्याची क्षमता आहे. त्‍यामुळे राज्याला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम पुढील पाच वर्षांत करण्यात येईल.

महाबळेश्वर येथे रविवारी (ता. ४) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे आयोजित ‘महापर्यटन उत्सव-२०२५’ चा शानदार समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. या प्रसंगी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पर्यटन तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, आमदार डॉ. अतुल भोसले, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

CM Devendra Fadnavis
Pune Tourism Development: पुणे जिल्हा पर्यटनात आघाडीवर नेणार : अजित पवार

पर्यटन महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘पर्यटन विभागाने वर्षभरातील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित होणाऱ्या उत्सव, सोहळ्यांचा समावेश करावा. यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच पोर्टलवर सर्व पर्यटन सुविधांची माहिती द्यावी.

CM Devendra Fadnavis
Satara Tourism : सातारा जिल्ह्याला पर्यटन हब करणार ः पालकमंत्री देसाई

या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘महाबळेश्वरमध्‍ये पर्यटनाची अमर्याद क्षमता आहे. मुनावळे जलपर्यटनालाही प्रतिसाद मिळतो आहे. इथल्या भूमिपुत्राला पर्यटनातून रोजगार उपलब्ध होताना कुटुंबासोबत भूमातेची सेवा करण्याची संधी मिळेल. महाबळेश्वरला नवे आणि सुंदर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असेल.’’

सभापती प्रा. शिंदे यांचे भाषण झाले. पर्यटनमंत्री देसाई यांनी प्रास्‍ताविक केले. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुनावळे येथील शिवसागर १० जेट्स लोकार्पण करण्यात आले. या वेळी विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जपानचे कौन्सिलेट जनरल यमाशीता सान, व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, संचालक डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पर्यटन महोत्सवाच्या ब्रँड अँबेसिडर मृणाल कुलकर्णी, नवेली देशमुख, समन्वय समिती सदस्य आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com