Wild Flower : रानोमाळ बहरली तेरड्याची फुले

Desi Flower Breed : गौरी गणपतीच्या सणाला पूजेकरिता तेरड्याची पाने-फुले वाहतात. तेरडा ही वनस्पती बाल्समिनेसी कुळातील असून तिचे शास्त्रीय नाव इंपॅटिएन्स बाल्समिना आहे.
Terda Flower
Terda FlowerAgrowon
Published on
Updated on

Pali News : जिल्ह्यात सर्वत्र माळरान, डोंगर व शेताच्या बांधावर आकर्षक तेरड्याची फुले फुलली आहेत. जांभळट, फिकट गुलाबी, लाल किंवा पांढरी अशा विविध आकर्षक रंगांची ही फुले सगळ्यांचेच लक्ष वेधत आहेत.

गणपतीबरोबर येणाऱ्या गौरीमातेला विशेषकरून ही फुले अर्पण केली जातात. त्यामुळे या झाडाला गौरी किंवा गौरीची फुले किंवा गुल मेहंदी असेही म्हटले जाते. गौरी गणपतीच्या सणाला पूजेकरिता तेरड्याची पाने-फुले वाहतात. तेरडा ही वनस्पती बाल्समिनेसी कुळातील असून तिचे शास्त्रीय नाव इंपॅटिएन्स बाल्समिना आहे.

Terda Flower
Wild Flower : श्रावणात रानफुलांनी बहरले डोंगर

ती मूळची दक्षिण आशियातील भारत आणि म्यानमार देशांतील असून जगभर इंपॅटिएन्स प्रजातीच्या ८५० ते १००० प्रजाती आहेत. भारतात यातील १५० प्रजाती आढळतात. ही वनस्पती समुद्रसपाटीपासून सुमारे १५०० मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशात, वनांमध्ये झाडाझुडपांच्या खाली वाढलेली आढळते. महाराष्ट्रात पश्‍चिम घाट, कोकण व दख्खनच्या पठारी भागांत वाढलेली आढळते.

वनस्पतीची वैशिष्ट्ये

पावसाळी सुरू झाला की तेरडा उगवायला सुरूवात होते. ही वनस्पती ३० ते ९० सेंमी उंच वाढते. खोड मांसल असून फांद्या आखूड असतात. पाने साधी, सुमारे १५ सेंमी लांब व भाल्यासारखी निमुळती असतात. तेरड्याच्या पानांची मांडणी सर्पिलाकार व कडा दंतूर असतात. फुले गुलाबी, लाल, भगवी एकाकी किंवा झुबक्यांनी पानांच्या बगलेत येतात.

Terda Flower
Wild Vegetables : पुरंदर किल्ले परिसरात बहरल्या रानभाज्या

औषधी आणि अन्य उपयोग

तेरडा हा पित्तशामक असून त्याची फुले पौष्टिक आणि थंड असतात. फिलिपिन्समध्ये फुलांचा उपयोग कंबरदुखीवरील उपचारासाठी केला जातो. फुलांमध्ये काही अँटिबायोटिक गुण सापडले आहेत, ज्यामुळे काही जंतू आणि बुरशी नष्ट होतात.

काही देशांत मेंदीप्रमाणे तेरड्याच्या पानांनी व फुलांनी हात व नखे रंगवितात. फुले थंडावा देणारी असून, ती भाजलेल्या जागी लावतात. आशियातील काही देशांत ही वनस्पती संधिवात, अस्थिभंग आणि बद्धकोष्ठता इत्यादी विकारांवर वापरतात. बियांपासून मिळणारे हिरवट व चिकट तेल स्वयंपाकात व दिव्यासाठी वापरतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com