Ujani Dam
Ujani DamAgrowon

Ujani Dam Update: उजनी धरणातून शेतीसाठी पाणी पुरवठा बंद!

Ujani Dam : ऑगस्ट उजडला तरी राज्यातील प्रमुख धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. राज्यातील बहुतांश भागात पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची गरज आहे.

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील उजनीमधून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणं ७० टक्के बहरणार नाही तोवर उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडलं जाणार नाही. दौंडवरून उजनीत सोडलं जाणारं पाणी बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे उजनीतून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आल्याची माहिती लाभ क्षेत्र विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

ऑगस्ट उजडला तरी राज्यातील प्रमुख धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. राज्यातील बहुतांश भागात पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची गरज आहे. परंतू धरणातील जलसाठा वाढलेला नाही. उजनी धरणात सध्या १३ टक्के पाणीसाठी आहे. खडकवासला, कळमोडी, कडीवळे या धरणातून दौंडवरून उजनीत पाणी सोडलं जातं. परंतु ही धरणं भरली नसल्यानं उजनीतील विसर्ग कमी करण्यात आला आहे.

Ujani Dam
Girna Dam : ‘गिरणा’त ३७, वाघूरमध्ये ५६ टक्के जलसाठा

मागील वर्षी १२ ऑगस्टला उजनी धरण १०१ टक्के भरलं होतं. तसेच गेल्यावर्षी १५ ऑगस्टपासून ४५ हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सोडला होता. परंतु यंदा मात्र १५ जून ते ८ जुलै दरम्यान सोलापूर जिल्ह्यात २० टक्क्यांहून कमी पाऊस पडला. त्यात आता ऑगस्टमध्ये पावसानं दडी मारल्यानं उजनी धरणात पाणी साठा वाढलेला नाही.

उजनीवरील पाईपलाईनमधीन सोलापूर, धाराशीव, जामखेड, कर्जत, करमाळा, इंदापूर, बारामती, बार्शीसह अन्य भागांनाही पिण्यासाठी पाणी सोडलं जातं. तसेच आषाढी वारीसाठी उजनीतून पाणी सोडलं जातं. यंदा मात्र पावसानं ऑगस्टमध्ये उघडीप दिल्यानं पाणी साठा वाढलेला नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ६० ते ७० टक्क्यांपर्यंत येत नाही तोवर शेतीसाठी पाणी सोडलं जाणार नाही, असं लाभक्षेत्रविकास प्राधिकरण अधिकाऱ्यांचे नियोजन आहे. कारण पाऊसमान यंदा कमी राहिलं तर पुढील वर्षी पाणी टंचाई निर्माण होऊ शकते, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com