Rabi Season 2024 : रब्बीसाठी तीन लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

Rabi Sowing : नांदेड जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात वाढ अपेक्षीत आहे. धरणसाठ्याची चांगली स्थिती पाहता कृषी विभागाकडून तीन लाख ५९ हजार ५२४ हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे.
Kolhapur Rabi Season
Kolhapur Rabi Seasonagrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात वाढ अपेक्षीत आहे. धरणसाठ्याची चांगली स्थिती पाहता कृषी विभागाकडून तीन लाख ५९ हजार ५२४ हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यात सर्वाधीक दोन लाख ४१ हजार १६२ हेक्टरवर हरभरा, ४३ हजार ७७८ हेक्टरवर गहू तर ५० हजार ७११ हेक्टरवर रब्बी ज्वारीचा पेरा प्रस्तावित केला आहे.

रब्बीसाठी सार्वजनिक व खासगी क्षेत्राकडून ६७ हजार ४९८ क्विंटल बियाण्यांची गरज असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय बेतीवार यांनी दिली. नांदेड जिल्ह्यातील रब्बी हंगामाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख २२ हजार ६१० हेक्टर आहे. यात मागील काही काळात वाढ होत आहे.

Kolhapur Rabi Season
Rabi Season : खानदेशात रब्बीसाठी शेती मशागतीला वेग येणार

जिल्ह्यातील यंदा आजपर्यंत झालेल्या दमदार पावसामुळे धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच जिल्ह्यालगत असलेल्या येलदरी, सिद्धेश्वर व इसापूर प्रकल्पातील पाणीसाठाही चांगला असल्यामुळे रब्बीसाठी पाणीपाळ्या उपलब्ध होतील. हे गृहित धरुन कृषी विभागाने पेरणी क्षेत्रात वाढ प्रस्तावित केली आहे.

मागीलवर्षी सर्वसाधारण क्षेत्राच्या १६० टक्क्यांनुसार तीन लाख ६० हजार १३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यात सर्वाधीक क्षेत्रावर दोन लाख ७७ हजार ७४६ हेक्टरवर हरभरा, ४१ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रावर गहू, २६ हजार ३०३ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली होती. यानुसार यंदाही कृषी विभागाकडून यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Kolhapur Rabi Season
Rabi Season 2024 : रब्बी हंगामासाठी ४५ हजारांवर क्विंटल बियाण्यांची मागणी

जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात तीन लाख ५९ हजार ५२४ हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यात दोन लाख ४१ हजार १६२ हेक्टरवर हरभरा, ४३ हजार ७७८ हेक्टरवर गहू, ५० हजार ७११ हेक्टरवर रब्बी ज्वारी, १० हजार ९५२ हेक्टरवर रब्बी मका, १० हजार हेक्टरवर करडई पेरणी प्रस्तावीत केली आहे.

शेतकऱ्याला रब्बीतगणाऱ्या रासायनिक खताची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. खरिपातील शिल्लक खतं तसेच मंजूर आवंटनामुळे खताची कमतरता पडणार नाही अशी माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

आगामी रब्बीसाठी प्रस्तावीत क्षेत्र (क्षेत्र हेक्टरमध्ये)

पीक सर्वसाधारण क्षेत्र प्रस्तावित क्षेत्र

हरभरा १,५३,३७० २,४१,१६२

गहू २७,७१३ ४३,७७८

रब्बी ज्वारी ३२,६९९ ५०,७११

रब्बी मका ३,८१८ १०,९५२

करडई २,४६४ १०,०००

एकूण २,२२,६१० ३,५९,५२४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com