Farmer Helpline : शेतकऱ्यांच्या तक्रारींचे एकाच कॉलवर होणार निवारण ; खुद्द केंद्रीय कृषिमंत्री ठेवणार देखरेख

Union Agriculture Ministry : हे तक्रार निवारण सुविधा केंद्र कृषी भवन येथे उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही व्यवस्था खुद्द केंद्रीय कृषिमंत्र्याच्या देखरेखीखाली असणार आहे.
Farmers Helpline
Farmers HelplineAgrowon
Published on
Updated on

Pune News : देशातील शतकऱ्यांच्या शेतीशी निगडीत समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून तक्रार निवारण हेल्पलाईन सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजना आणि शेतीशी संबंधित समस्यांवरील उपायांची माहिती मिळणार आहे. हे तक्रार निवारण सुविधा केंद्र कृषी भवन येथे उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही व्यवस्था खुद्द केंद्रीय कृषिमंत्र्याच्या देखरेखीखाली असणार आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून जारी केले जाणारी हेल्पलाईन सुविधा मध्य प्रदेश सरकारच्या 'सीएम किसान'च्या धरतीवर काम करणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही सुविधा सुरू केली होती. शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित समस्यांची तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाईन क्रमांक देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारी सोडविण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील.

Farmers Helpline
Helpline Number For Snakebite : सर्पदंशावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून हेल्पलाईन नंबर

शेतकऱ्यांना होणार फायदा

या संदर्भात कृषिमंत्री चौहान यांनी म्हटले आहे की, देशातील शेतकऱ्यांना छोट्या-मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ शेतकऱ्यांना पॉलिहाऊस बांधण्यासाठी अनुदान कसे मिळवायचे. यासारख्या समस्या येतात. या हेल्पलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एक संपूर्ण व्यवस्था केली जाईल. तसेच शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या वेळीच सोडविल्या जातील याचीही काळजी घेतली जाईल, असे चौहान यांनी सांगितले.

Farmers Helpline
Agriculture Helpline : ‘कृषी तक्रार हेल्पलाइन’ वर तक्रारींचा होतोय पाऊस

तक्रार ट्रॅक करता येणार

शेतकऱ्यांनी तक्रार नोंद केल्यानंतर प्रत्येक तक्रारारीसाठी एक विशेष रेफरेन्स नंबर दिला जाईल. या रेफरेन्स क्रमांकाच्या आधारे तक्रारीचे ट्रॅकींग करू शकतो. शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित विभागाकडे ही तक्रार पाठविली जाईल. तसेच एका विशिष्ट कालमर्यादेत या तक्रारीचे निराकरण करण्याच्याही सुचना करण्यात येतील.

सीएम किसान मॉडेल

मध्य प्रदेश सरकारनेही सीएम किसान हेल्पलाईन नावाने अशीच सुविधा राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली होती. याला तक्रार निवारण प्रणालीचे देशातील सर्वोत्तम मॉडेल मानले जाते. जेथे शेतकरी एका टोल फ्री क्रमांकावरून आपली तक्रार नोंदवू शकतात. या माध्यमातून शेतकरी राज्य सरकारच्या सर्व योजनांची माहितीही देखील मिळवू शकतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com