Jayakawadi Dam : जायकवाडीतील विसर्गात घट-वाढ सुरूच

Water Storage : मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पातील विसर्गात आवकेच्या दृष्टीने सुरक्षितता बाळगून घट-वाढ करणे सुरू आहे.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पातील विसर्गात आवकेच्या दृष्टीने सुरक्षितता बाळगून घट-वाढ करणे सुरू आहे. गुरुवारी (ता. २६) दुपारी ५६ हजार क्युसेक्सच्या पुढे सुरू असलेला पाण्याचा विसर्ग शनिवारी (ता. २८) सकाळी ६ वाजताच्या सुमारास १५ हजार २७२ क्युसेकपर्यंत खाली आणला गेला होता.

माहितीनुसार, जायकवाडी प्रकल्पातून गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास १८ गेट तीन फुट उघडून ५६ हजार ५९२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. तो त्याच दिवशी सायंकाळी चार वाजेपर्यंत कायम होता.

गुरुवारी रात्री ८ वाजता सुरू असलेला विसर्ग ९४३२ क्यूसेकने कमी करून ४७ हजार १६० क्युसेकवर आणण्यात आला. त्यावेळी १८ गेट २.५ फूट उघडण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री १० वाजता पुन्हा ९४ हजार ३२१ विसर्ग घट करून ३७ हजार ७२८ क्युसेकवर नेण्यात आला.

Water Storage
Koyna Dam Water : कोयना धरण क्षेत्रात १२५ मिमी पाऊस, तर वारणा धरण १०० टक्के भरलं

शुक्रवारी (ता २७) सकाळी ६ वाजता प्रकल्पाचे १८ गेट २ फूट उघडून ३८ हजार ३२८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. शुक्रवारी सकाळी ७ वाजता उघडलेले १८ गेट अर्धा फूट बंद करून केवळ दीड फूट उघडत २८ हजार २९६ क्युसेकपर्यंत विसर्गात घट करण्यात आली होती.

शुक्रवारी सकाळी पुन्हा ११ वाजता सर्व १८ गेट केवळ एक फूट उघडून विसर्ग १८ हजार ८६४ क्युसेकवर आणण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता एक फुट उघडलेल्या प्रकल्पाच्या १८ गेटमधून १९ हजार ४६४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. शुक्रवारी रात्री नऊ वाजता त्यात पुन्हा घट करून विसर्ग ९४३२ क्युसेकवर आणण्यात आला.

Water Storage
Jayakawadi Water Storage : जायकवाडीचा पाणीसाठा स्थिर; प्रकल्प जवळपास तुडुंबच

शनिवारी पहाटे ४:३० ते ५ वाजेदरम्यान मात्र १० गेट दीड फूट उघडून ५२४० क्युसेकने विसर्गात वाढ करत विसर्ग १४ हजार ६७२ क्युसेकवर नेण्यात आला. सकाळी ७.३० ते ८ वाजेदरम्यान पुन्हा विसर्गात ४१९२ क्युसेकची वाढ करून विसर्ग १८ हजार ८६४ क्युसेकवर नेण्यात आला होता.

जायकवाडी प्रकल्पात ९९ टक्के पाणीसाठा

शनिवारी (ता. २८) सकाळी ६ वाजताच्या सुमारास जायकवाडी प्रकल्पात ९९.८९ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामध्ये ७६.५७ टीएमसी जिवंत तर १०२.६४ टीएमसी एकूण पाणीसाठ्याचा समावेश होता. त्यावेळी प्रकल्पात २५ हजार १९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. गेटमधून होत असलेल्या विसर्गासोबतच माजलगाव प्रकल्पासाठी उजव्या कालव्यातून ६०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com