Basaveshwar Yatra: शिवलिंग रुद्राभिषेक, पंचकलश पूजेने ग्रामदैवत महात्मा बसवेश्‍वरांच्या यात्रेला सुरुवात

Traditional Festival: ग्रामदैवत महात्मा बसवेश्‍वरांच्या यात्रेला बुधवारी (ता. ३०) पहाटे मंदिरातील शिवलिंगाची रुद्राभिषेक व पंचकलश पूजेनी सुरुवात झाली.
Basaveshwar Yatra
Basaveshwar YatraAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News: ग्रामदैवत महात्मा बसवेश्‍वरांच्या यात्रेला बुधवारी (ता. ३०) पहाटे मंदिरातील शिवलिंगाची रुद्राभिषेक व पंचकलश पूजेनी सुरुवात झाली. सकाळी दहा वाजता सालाबाद प्रमाणे परिसरातील अनेक पशुधन व बैलजोड्यांची गावातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून उत्कृष्ट पशूंना पारितोषिके देण्यात आली. बैलजोड्यांची मिरवणुक हे यात्रेच्या पहिल्या दिवशीचे आकर्षण असते.

Basaveshwar Yatra
Jyotiba Yatra: चांगभलं'च्या गजरात दुमदुमला ज्योतिबा डोंगर

जेवळी येथे महात्मा बसवेश्‍वरांचे पुरातन मंदिर असून येथे जयंती यात्रेच्या स्वरूपात साजरी केली जाते. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवाची सुरूवात बुधवारी (ता. ३०) पहाटे पाचच्या सुमारास मंदिरातील शिवलिंगाची पंचकलश पूजा, रुद्राअभिषेकाने झाली. सकाळी आठ वाजता येथील काशिनाथ स्वामी यांच्या घरी बसवेश्‍वरांच्या पाळण्याचा कार्यक्रम पार पडला. दहा वाजता परिसरातील पशू पालकांनी आणलेल्या पशुधन व बैलजोड्यांची गावातील मुख्यरस्त्यावरुन सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी या पशूंना बैलपोळा प्रमाणे मोठ्या प्रमाणात सजविण्यात आले होते. ही मिरवणूक मंदिर परिसरात गेल्या नंतर जिल्हा स्तरीय पशू प्रदर्शन पार पडले.

उत्कृष्ट पशुपालकांचे गटनिहाय नावे अशी - खिल्लार बैल जोडी ः प्रथम- अंकुश माळी, द्वितीय- सूर्यकांत पणुरे, खिल्लार खोंड जोडी ः प्रथम- संजय राजपूत, द्वितीय - भास्कर गायकवाड, खिलार खोंड (सिंगल) : प्रथम- सत्येश्‍वर कारभारी, द्वितीय पिंटू पंचभाई, जवारी बैल जोडी: प्रथम सीताराम, जाधव, द्वितीय ताराचंद राठोड, जवारी खोंड जोडी : प्रथम- गुणवंत कारभारी, द्वितीय- शब्बीर पठाण,

Basaveshwar Yatra
Madhi Yatra : मढीत मानाची होळी पेटवून कानिफनाथ मुख्य यात्रेला सुरुवात

देवणी बैल जोडी : प्रथम- अप्पाशा गोवे, द्वितीय- रणवीर पाटील, देवणी खोंड जोडी : प्रथम- महादेव मोघे, द्वितीय- निलाप्पा राठोड, देवणी खोंड (सिंगल) : प्रथम- सुभाष आडे, द्वितीय- ज्ञानेश्‍वर साळुंखे, जरशी (संकरित) बैल जोडी : प्रथम मल्लिनाथ कोराळे, द्वितीय- काशिनाथ चवले, जरशी खोंड जोडी : प्रथम- सचिन कारभारी, द्वितीय- अरविंद माळी, जवारी गाय : प्रथम- वैजनाथ, द्वितीय मडोळे, प्रभू तोरे,

देवणी गाय : प्रथम- वैजनाथ हावळे, द्वितीय- विजय ढोबळे, जरशी गाय : प्रथम- बालाजी जांभळे, द्वितीय- मोहन पणुरे, कंदारी गाय : प्रथम- बाबू जाधव, द्वितीय बाळासाहेब कुलकर्णी, खिलार गाय : प्रथम- महादेव होनाजे, द्वितीय- दिलीप भैरप्पा, खिलार कारवड : प्रथम- सिद्धू गवारे, द्वितीय- शिवा नकाशे, जरशी कारवड : प्रथम- रमेश हावळे, द्वितीय- राहुल हावळे, घोडा प्रथम बाबा घोडेवाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com