Farmer Subsidy : ‘चांदा ते बांदा’तील हजारो शेतकऱ्यांचे अनुदान अडकले

Chanda Te Banda : चंद्रपूर व सिंधुदुर्ग या मागास जिल्ह्यांमध्ये परंपरागत उद्योग व कृषीवर आधारित जोड धंद्यांना चालना देऊन लोकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी सुरू करण्यात आलेली चांदा ते बांदा या योजनेचे अनुदान रखडले आहे.
Chanda te banda
Chanda te bandaAgrowon

Sindhudurg News : ‘चांदा ते बांदा’ योजनेअंतर्गत भातपीक प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतलेल्या जिल्ह्यातील हजारांहून अधिक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. ही योजना बंद झाल्यामुळे हजारो शेतकरी चिंतेत आहेत. या शेतकऱ्यांना अनुदान द्यायचे कसे, असा प्रश्न कृषी विभागासमोर निर्माण झाला आहे.

Chanda te banda
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांदा ते बांदा योजनेचे १६९ कोटी शिल्लक

सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी तत्कालीन सरकारने ‘चांदा ते बांदा’ योजना राबविली. या योजने अंतर्गत विविध वैयक्तिक योजना शेतकऱ्यांना देण्यात आल्या. दरम्यान २०१९ मध्ये ‘चांदा ते बांदा’ योजनेतून जिल्ह्यात भातपीक प्रात्यक्षिक योजना राबविली गेली.

या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी शेतकऱ्यांना ६ हजार ७०० रुपयांचे साहित्य देण्यात येणार होते. त्यामध्ये लाभार्थी हिस्सा ५०० रुपये होता. उर्वरित ६ हजार २०० रुपये अनुदान शासन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार होते.

Chanda te banda
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः दीपक केसरकर

या योजनेतून शेतकऱ्यांना बॅट्री पॉवर स्प्रे, कोळपणी यंत्र आणि १५ किलो झिंक सल्फेट असे किट देण्यात आले. शेतकऱ्यांकडून सर्व रक्कम घेण्यात आली. जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग दर्शविला.

मात्र मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला. त्या कालावधीतील सर्व अनुदान थांबविण्यात आले. त्यानंतर शासनाने ‘चांदा ते बांदा’ योजनाच बंद केली. कृषी विभागाने तालुकास्तरावर शक्य तितक्या शेतकऱ्यांना अन्य योजनांतून लाभ दिला. परंतु शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे कृषी विभाग हतबल आहे. साधारणपणे सर्व शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी ६२ लाख रुपये निधीची गरज आहे.

शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु सिंधुरत्न योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, असा प्रस्ताव दिला आहे.
- कैलाश ढेपे,  तालुका कृषी अधिकारी, देवगड, जि. सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना अनुदान देय आहे, याची माहिती घेऊन त्यानुसार त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.
- विजयकुमार राऊत, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, सिंधुदुर्ग

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com