Malvan Band : मालवणमध्ये कडकडीत बंद

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट (ता. मालवण) येथे उभारलेला शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने बंद पुकारला.
Malvan Band
Malvan Band Agrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट (ता. मालवण) येथे उभारलेला शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने बंद पुकारला. दरम्यान, किल्ल्यावर ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे राडा झाला. दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीने बुधवारी (ता.२८) पुकारलेल्या ‘मालवण बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर डिसेंबरमध्ये उभारलेल्या शिवछत्रपतींचा पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाविकास आघाडीकडून ‘मालवण बंद’ची हाक देण्यात आली होती.

Malvan Band
Chhatrapati Shivaji Maharaj statue : नागपुरात उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांत भव्य पुतळा

बुधवारी सकाळपासून मालवणात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मालवणात जमा झाले. दरम्यान, खासदार नारायण राणे हे किल्ल्यावर दाखल झाले.

Malvan Band
Administrative Issues : ‘महसूल’चे अधिकारी लोकांची अडवणूक करतात : लंके

त्यांनी पाहणी केल्यानंतर अवघ्या काही वेळातच शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांसह महाविकास आघाडीचे विविध नेते किल्ल्यावर आले.

दरम्यान, शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. या वेळी दोनही पक्षांचे कार्यकर्ते भिडल्याने जोरदार हाणामारी झाली. खासदार नारायण राणे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे बराच वेळ तेथे किल्ल्यावर होते. दरम्यान, महाविकास आघाडीने पुकारलेल्या मालवण बंदला प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com