Nashik News : नाशिक शहराचा विस्तार वाढत असल्याने वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रस्तावित किकवी धरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण बांधून ६५ वर्षे पूर्ण झाली असून, त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. गाळामुळे धरणाच्या जिवंत साठ्यातून ४३.७४९ दशलक्ष घनमीटर पाणी कमी झाले. धरणाच्या उर्ध्व बाजूस किकवी नदीवर ७०.३६ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे (६०.०२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा) नवीन धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी शासनाने ऑगस्ट २००९ मध्ये २८३ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता दिली होती.
या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली १७२ हेक्टर पर्यायी वनजमीन डिसेंबर २०१० अन्वये वन विभागाकडे वर्ग करण्यात आली. वनजमीन हस्तांतरण प्रस्तावास तत्कालीन खासदार समीर भुजबळ, तत्कालीन केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयंती नटराजन यांनी फेब्रुवारी २०१४ मध्ये मान्यता दिली.
या प्रकल्पाच्या बांधकामासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दहा गावांतील ७३४ हेक्टर खासगी जमिनीच्या भूसंपादनासाठी संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून, भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे. मात्र, उच्च न्यायालय किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकल्पासंदर्भात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणी दूर झाल्या असून, हा प्रकल्प आता मार्गी लागल्याचा दावा श्री. भुजबळ यांनी केला.
किकवी प्रकल्पाचे फायदे
१.५० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती
वन क्षेत्र व वन्य प्राणी यांचा विकास करण्याची संधी
आदिवासी क्षेत्राला सिंचनासाठी अप्रत्यक्ष लाभ
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.