Sarpanch Protest : गाव कारभाऱ्यांचं मानधन वाढणार ; सरपंच परिषदेच्या आंदोलनाला यश

Rural Development Minister : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंचांच्या मानधन वाढीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
Sarpanch Protets
Sarpanch ProtetsAgrowon
Published on
Updated on

Pune News : गावचा गावगाडा हाकणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे मानधन वाढविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. ग्रामपंचायत स्तरावरील विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्यावतीने मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू होते. हजारोंच्या संख्येने राज्यभरातील सरपंच या आंदोलनात सहभागी झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. मंत्री महाजन यांनी सरपंचांच्या मागण्या मान्य आश्वासन देण्यात आले आहे. तसेच सरपंचांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव आठवड्यात मान्य करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मागण्या मान्य झाल्यानंतर सरपंचाचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

Sarpanch Protets
Sarpanch Parishad : गावकारभाऱ्यांना सावत्रपणाची वागणूक का?

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंचांच्या मानधन वाढीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. तसेच ग्रामपंचायतींना अधिकाधिक निधी देण्यासंदर्भातही सरकार सकारात्म आहे. ग्रामपंचायतींच्या निधीबाबत सुवर्णमध्य काढला जाईल. सरपंचांना मिळणारे मानधन कमी असून त्यात वाढ करण्याची मागणी सरपंचांनी केली होती. या संदर्भात येत्या आठ दिवसांमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होईल, असे आश्वासनही महाजन यांनी यावेळी दिले.

Sarpanch Protets
Sarpanch Fraud : पतीच्या बँक खात्यावर कर घेतल्याने सरपंचपद रद्द

मागण्यांबाबत सरकार सकारात्मक

सरपंचांच्या मानधन वाढीसह अन्य मागण्याही करण्यात आल्या होत्या. यामध्ये छोटी कामे असतील, तर १५ लाखांपर्यंत कामे द्यावीत, अशीही मागणी होती. पंरतू न्यायालयाच्या निर्णय असल्याने तीन लाखांपर्यंतची कामे देता येतात.

याप्रश्नी योग्य तोडगा काढला जाईल, असे महाजन यांनी सांगितले. या व्यतिरिक्त इतर मागण्या तांत्रिक असून त्यासुध्दा सचिवांसोबत बसून मार्गी लावल्या जातील. दरम्यान, आंदोलक सरपंचांच्या दोन्ही प्रमुख मागण्यांवर सरकार सकारात्मक असून यावर लवकरच निर्णय होईल, असेही ते म्हणाले.

काय आहेत मागण्या?

  • सरपंचांना १५ हजार रुपये तर उपसरपंचांना १० हजार रुपये आणि ग्रामपंचायत सदस्यांना तीन हजार रूपये मानधन मिळावे.

  • ग्रामपंचायत संदर्भातील सर्व घटकांना विमा, पेन्शन, निश्चित वेतन लागू करावे.

  • मुंबईमध्ये सरपंच भवनाची स्थापना करावी.

  • ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद एकत्रित करुन पंचायत विकास अधिकारी म्हणावे.

  • ग्रामरोजगार सेवकाची नेमणूक पूर्णवेळ करुन वेतनिश्चिती करावी.

  • संगणक परिचालकांचा भार ग्रामपंचायतीऐवजी शासनाने उचलावा.

  • संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधात आणावे

  • यावलकर समितीचा अहवाल लागू करावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com