Janaushadhi Kendra : जनऔषधी केंद्र सुरू करण्यासाठी नियमावली

Generic Medicines : सहकारी संस्थेने स्वत:चे जनऔषधी केंद्र सुरू केल्यास संस्थेस नवीन उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते. सभासदांच्या औषधांच्या पैशात बचत होईल.
Janaushadhi Kendra
Janaushadhi KendraAgrowon

मिलिंद आकरे, हेमंत जगताप
Agricultural Credit : प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांकडील सभासद संख्या सुमारे ५०० पेक्षा अधिक आहे. हे सभासद इतर दुकानांमधून औषधे खरेदी करतात. त्याऐवजी सहकारी संस्थेने स्वत:चे जनऔषधी केंद्र सुरू केल्यास संस्थेस नवीन उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते. सभासदांच्या औषधांच्या पैशात बचत होईल.

अर्जदार प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राचे कार्य सुरू करण्यापूर्वी करार करेल. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राचे सर्व कामकाज कराराच्या अटी व शर्तींनुसार आयोजित केले जाईल. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राच्या नावाने औषध परवाना मिळवण्याची आणि औषध दुकान चालविण्याच्या इतर परवानग्या घेण्याची जबाबदारी अर्जदाराची असेल.

औषधांच्या साठवणुकीसाठी सर्व वैधानिक आवश्यकतांचे पालन अर्जदाराद्वारे सुनिश्चित केले जाईल.
१) अर्जदार केवळ जागेचा वापर त्याच कारणासाठी करेल ज्यासाठी ती जागा देण्यात आली आहे आणि इतर उद्देश अथवा परिसरातील इतर कामकाजासाठी सदर जागा वापरता येणार नाही तसेच परिसरातील इतर कोणालाही थेट किंवा अप्रत्यक्षपणे जागा भाड्याने कोणालाही देता येणार नाही.

२) सर्व बिलिंग पीएमबीआयने प्रदान केलेले सॉफ्टवेअर वापरून करणे आवश्यक आहे. ‘‘पंतप्रधान भारतीय जनऔषधी केंद्र”मध्ये कोणतेही इतर औषध विकता येणार नाही.
३) पंतप्रधान भारतीय जनऔषधी केंद्र ऑपरेटरना इतर केमिस्टच्या दुकानांमधून सामान्यतः विकल्या जाणाऱ्या संबंधित वैद्यकीय उत्पादनांची विक्री करण्याची परवानगी दिली जाईल, पण त्यांना फार्मास्युटिकल व मेडिकल डिव्हायसेस ब्युरो ऑफ इंडियाच्या (PMBI) उत्पादनांशिवाय इतर औषधे विकण्याची परवानगी नाही.
४) प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र ऑपरेटरना माल पाठविण्याच्या आगाऊ देयकावर मालाचा पुरवठा केला जाईल.
टीप ः इतर संपूर्ण तपशील स्वतंत्रपणे अर्जदाराशी करण्यात येणाऱ्या करारामध्ये नमूद करण्यात आलेला आहे.

Janaushadhi Kendra
Madh Kendra Yojana : ग्रामोद्योग मंडळातर्फे मध केंद्र योजना

फार्मास्युटिकल व मेडिकल डिव्हायसेस ब्युरो ऑफ इंडियाची इतर कार्ये, पत्ता, संकेतस्थळ :

अ) योजनेच्या योग्य अंमलबजावणीसाठी, फार्मास्युटिकल व मेडिकल डिव्हायसेस ब्युरो ऑफ इंडिया (PMBI) प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेचे उद्दिष्ट पुढे नेण्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र चालवणाऱ्या ऑपरेटिंग एजन्सीला सर्व आवश्यक साह्य देईल.
ब) फार्मास्युटिकल व मेडिकल डिव्हायसेस ब्युरो ऑफ इंडिया पंतप्रधान भारतीय जनऔषधी केंद्राला पुरवठा साखळीद्वारे आगाऊ देयक अदा केल्यानंतर स्वस्त दरात दर्जेदार जेनेरिक औषधे व सर्जिकल वस्तूंचा पुरवठा करेल.

फार्मास्युटिकल व मेडिकल डिव्हायसेस ब्युरो ऑफ इंडियाचा पत्ता ः
संकेतस्थळ ः www.janaushadhi.gov.in किंवा http://janaushadhi.gov.in/online_registration.aspx या संकेतस्थळावर नोंदणी संबंधित माहिती उपलब्ध आहे.
पत्ता ः
मुख्य कार्यकारी अधिकारी,
फार्मास्युटिकल्स आणि मेडिकल डिव्हाइस ब्युरो ऑफ इंडिया (PMBI)
८वा मजला व्हिडिओकॉन टॉवर, ब्लॉक E-१,
झंडेवालान विस्तार,
नवी दिल्ली -११००५५
दूरध्वनी - ०११-४९४३१८००

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे यादी

प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थानी प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रासाठी अर्ज करण्याची कार्यपद्धती ः
१) www.janaushadhi.gov.in किंवा http://janaushadhi.gov.in/online_registration.aspx या संकेतस्थळाला भेट द्यावी.
२) Apply for Kendra वर क्लिक करावे.
३) त्यानंतर click here to apply वर क्लिक करावे.
४) Register now वर क्लिक करून त्यात मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी बाबत माहिती भरावी.
५) यशस्वी नोंदणीनंतर ई-मेल आयडी वर user id व password प्राप्त होईल व पोर्टल वर भेट देण्यासाठी सदर user id व password चा उपयोग करण्यात यावा.
६) पंतप्रधान जनऔषधी केंद्र उभारणीसाठी संबंधित बँक खात्यात रक्कम भरावी.
७) अर्ज काळजीपूर्वक भरावा (टप्पा क्र. १ मूलभूत माहिती व अर्जाचे प्रक्रिया शुल्क ५,००० रुपये (शासकीय श्रेणीमध्ये), तसेच टप्पा क्र. २ मध्ये जनऔषधी केंद्र तपशील आणि इतर माहिती.)
८) आवश्यक कागदपत्र ऑनलाइन सादर करणे जसे की प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था कागदपत्रे जसे की नोंदणी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड व सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट इत्यादी.
९) प्रत्येक कागदपत्रे २०० kb या साइजमध्ये pdf/ jpeg/ png/ jpg फॉरमॅटमध्ये अपलोड करावी.
१०) सर्व कागदपत्र व अर्ज व्यवस्थित अंतिमतः तपासून मगच फायनल सबमिट बटणवर क्लिक करावे.
यानंतर, तुमचा अर्ज यशस्वीरीत्या सबमिट केला गेला आहे आणि त्याबाबत अर्जदाराच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर माहिती प्राप्त होईल. अर्जदार कधीही लॉग इन करून त्यांच्या अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासू शकतात. त्याच पोर्टलवर किंवा हेल्प लाइन नंबर १८००१८०८०८० वर अधिक माहितीसाठी कॉल करू शकता.

---------------------------
संपर्क ः प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०
(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com