Marathwada Rain Update : लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाची उघडीप; प्रकल्पांत आवक सुरूच

Latur Rain News : मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू, मांजरा धरणाची वाटचाल शंभरीकडे; निम्न तेरणात ५५ टक्के पाणी.
Latur River
Latur RiverAgrowon
Published on
Updated on

Dharashiv Rain: दोन्ही जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. पावसाने सोमवारी (ता. २) दुपारनंतर उघडीप दिली तरी नदी व नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे विविध प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून मांजरा धरणाची वाटचाल शंभर टक्के भरण्याकडे सुरू झाली आहे. धरणात दुपारी बारापर्यंत ६१.८९ टक्के पाणीसाठा आला होता. माकणी (ता. लोहारा) येथील निम्न तेरणा प्रकल्पातील पाणीसाठाही ५५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

सर्वच प्रकल्पांच्या पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी पावसाने जोर धरला होता. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. धाराशिव जिल्ह्यात तर पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून दोन्ही जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीच्या पावसाची टक्केवारी १३० च्या पुढे सरकली आहे.

एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाने खरीप हंगामातील पिके पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पीकविम्याची भरपाई मिळावी, म्हणून पीकविमा कंपनीला नुकसानीच्या पुर्वसूचना देण्यासाठी धावपळ करत असताना दुसरीकडे काही रस्त्यांवरील पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. घरांची पडझड झाली व जनावरे मृत्यमुखी पडली.

Latur River
Marathwada Rain : धाराशिव, लातूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस

यात नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला. सोमवारी दुपारनंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर नदीच्या पाण्याची पातळी ओसरू पावसाची उघडीप; प्रकल्पांत आवक सुरूच मांजरा धरणाची वाटचाल शंभरीकडे; निम्न तेरणात ५५ टक्के पाणी देवणी : पावसाच्या उघडिपीनंतरही मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे.

नुकसानीचे पंचनामेकरण्याचे आदेश जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.

नदीकाठच्या गावांमध्येविशेष खबरदारी घेण्याच्या आणि सर्व अधिकाऱ्यांनी फिल्डवर राहून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाल्याने नुकसानीची अचूक माहिती संकलित करून एकाही शेतकऱ्याचे नुकसान यामधून सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना महाजन यांनी केली.

लागताच बंद वाहतूक सुरळीत झाली आहे. या स्थितीत शेतात साचलेले पाणी बाहेर पडत असून नदी व नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात सातत्याने भर पडत आहे. मांजरा धरणात दोन दिवसांत वीस टक्के पाणी आले आहे.

मंगळवारी (ता. ३) सकाळी सहा वाजता प्रकल्पात साठ टक्के पाणीसाठा झाला होता. निम्न तेरणातही सध्या पाण्याची आवक सुरू असून प्रकल्पाचा साठा वाढण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांतील पाणीसाठ्यात दहा दिवसांत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात व्हटी (ता. रेणापूर) प्रकल्पात शंभर टक्के साठा झाला असून रेणापूर प्रकल्पात ९५ टक्क्यांच्या पुढे पाणी आले आहे.

मसलगा प्रकल्पात ८७ व घरणी प्रकल्पात ६७ टक्के तर तिरू, देवर्जन व साकोळ प्रकल्पात ३५ टक्क्यांच्या पुढे पाणीसाठा झाला आहे. परवापर्यंत कोरड्या असलेल्या तावरजा प्रकल्पात नऊ टक्के पाणी आले असून रायगव्हाण (ता. कळंब) मध्यम प्रकल्पाच्या मृत साठ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. लहानमोठ्या १३४ लघू पाटबंधारे प्रकल्पांतही ५० टक्क्यांच्या पुढे पाणी आहे. मांजरा, तेरणा व रेणा नद्यांवरील २७ उच्चस्तरीय बंधाऱ्यांत ५७ टक्के पाणी असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com