Rahul Gandhi : सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येला मुख्यमंत्री, संघाची विचारसरणी जबाबदार; राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप

Rahul Gandhi on Somnath Suryavanshi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत.
Rahul Gandhi Meets Somnath Suryavanshi's Family
Rahul Gandhi Meets Somnath Suryavanshi's FamilyAgrowon
Published on
Updated on

Pune News : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (ता. २३) परभणीत हिंसाचारात मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी, सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या पोलिसांनी केली. याला हत्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संघाची विचारसरणी जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एरदा तापण्याची शक्यता आहे.

राज्याचे राजकारण गेल्या काही दिवसापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यासह विविध मुद्द्यांमुळे तापलेले आहे. यातच बीड येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील आंबेडकरी अनुयायी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येचे पडसाद संसदेपर्यंत उमटले आहे. यावरून सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी निशान्यावर घेतले असतानाच आज राहुल गांधी यांनी परभणी दौैरा केला.

Rahul Gandhi Meets Somnath Suryavanshi's Family
Nana Patole : परभणीत हिंसाचार सरकार बेफिकीर; महायुतीत मंत्रीपदे व मलईदार खात्यांसाठी मारामारी, पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

या दौऱ्यात त्यांनी, सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच त्यांनी कुटुंबियांशी २५ ते ३० मिनीटे चर्चा केली. या भेटीनंतर राहुल गांधी यांनी राज्य सरकार, पोलिस प्रशासन आणि संघावर आरोप केले आहेत.

राहुल गांधी यांनी, सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या झाली असून ती पोलिसांनी केली आहे. पोलिसांच्या मारहाणीतच सुर्यवंशी यांचे प्राण गेले. हे वैद्यकिय अहवालात स्पष्ट होत आहे. यामुळे सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळायला हवा. तर या हत्येला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

Rahul Gandhi Meets Somnath Suryavanshi's Family
Maharashtra Assembly Winter Session : हत्या, हिंसाचाराचे सभागृहात पडसाद

सोमनाथ सुर्यवंशी हे दलित होते म्हणून त्याच्यांवर अन्याय झाला. तो पोलिसांनी केला. त्यांना मारहाण केली. ते दलित आहेत म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला राज्याचे पोलिस, राज्याचे मुख्यमंत्री आणि संघाची विचारधारा जबाबदार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

तसेच आपण येथे कोणतेही राजकारण करण्यासाठी आलो नसून येथे राजकारण केले जात नाही असाही दावा राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे. तर राहुल गांधी यांनी फडणवीस यांच्यावर निशाना साधताना, विधानसभेत निवेदन देताना ते खोटं बोलले असेही राहुल गांधींनी यावेळी म्हटले आहे.

Rahul Gandhi Meets Somnath Suryavanshi's Family
Rahul Gandhi : धक्काबुक्कीप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल; नव्या फौजदारी कलमाच्या कचाट्यात राहुल गांधी अडकणार?

नेमकी काय आहे घटका?

परभणी येथील रेल्वे स्थानकाबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा असून येथे संविधानाच्या प्रतिकृतीची कथितपणे विटंबना झाली होती. यानंतर तणाव निर्माण झाला होता. तर पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले होते. यात सोमनाथ सुर्यवंशी यांचाही समावेश होता. तर पोलिस कोठडीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता.

कोणालाही सोडलं जाणार नाही : फडणवीस

दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या भेटीवरून टीका केली. राहुल गांधी यांची ही भेट राजकीय असून ते फक्त याचे भांडवल करत आहेत. याआधीच सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाणार आहे. जर या चौकशीत मारहाण झाल्याचे माहिती समोर आली तर कोणालाही सोडलं जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com