PM Modi : प्लॅनिंग आणि व्हिजनचा अभावामुळेच पुण्यासह देशाचा विकास थांबला, पंतप्रधान मोदी यांची विरोधकांवर टीका

PM Modi in inaugurated Program : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील ११ हजार २०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले
PM Modi
PM ModiAgrowon
Published on
Updated on

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.२९) विरोधकांवर जोरदार निशाना साधला. प्लॅनिंग आणि व्हिजनचा अभावामुळेच पुण्याचा विकास झाला नाही. विरोधकांनी आठ वर्षात मेट्रोचा एक पिलरसुद्धा उभा केला नाही. पण आम्ही दहा वर्षात पुण्यात अनेक ठिकाणी मेट्रो पोहचवली असे मोदींनी म्हटले आहे. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मेट्रो मार्गाचं लोकर्पणासह सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमात राज्यातील ११ हजार २०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

PM Modi
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द, पावसाचा फटका

यावेळी मोदींनी विरोधकांचा समाचार घेताना, मागिल सरकारने फाईल आडवण्याचे काम केलं. देशातील शहरांचा विकास झाला पाहीजे. पुण्यात मेट्रो आधीच यायला पाहिजे होती. मात्र प्लॅनिंग आणि व्हिजनचा अभाव मागिल सरकारमध्ये होता. यामुळेच कोणतीही योजना लवकर झाली नाही. तर जी झाली त्याच्या उद्घाटनाला अनेक दशके लागली. यामुळे देशासह पुण्याचे नुकसान झाले.

पण आमच्या काळात जुन्या वर्क कल्चरला बाजुला सारून पुण्यात मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेतला. पुणे मेट्रोचा निर्णय २००८ चा पण काम सुरू झालं २०१६ ला. यातही विरोधकांनी अडचणी आणल्या. पण आम्ही तिकडे लक्ष न देता काम केलं. आज पुणे मेट्रोचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. जुना विचार आणि कार्यपद्धती वापरली असती तर एकही काम पूर्ण झाले नसते असा विरोधकांना टोला मोदींनी लगावला आहे.

PM Modi
PM Narendra Modi : भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था : मोदी

तसेच मागच्या सरकारने महिलांची एन्ट्री बंद केली. सैनिक शाळेत महिलांना प्रवेश नव्हता. शाळेचे दरवाजे मुलींना बंद केले. यामुळे मुलींची टक्केवारी कमी झाली होती. प्रेगन्सीमध्ये महिलांना नोकरी सोडावी लागायची. पण आम्ही मागच्या सरकारच्या मानसिकतेला बदललं. यामुळे आज महिलांना फायदा होत आहे. त्यांना शाळेत शौचालय मिळत आहे. शाळा सोडण्याचं प्रमाणही कमी झाले आहे. मुली सैन्यात मोठ्या पदावर असल्याचेही मोदी म्हणाले.

राहूल गांधींनी विदेशात देशाची बदनामी केली

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करावा लागला. यावरून विरोधकांनी टीका केली. पण आज मेट्रो, भिडे वाडा आणि इतर विकास कामांचे उद्घाटन झाले. विरोधकांची भूमिका ही मांडगूळा प्रमाणे आहे. विरोधक लाडक्या बहिण योजनेत खोडा घालतात. आता बहिणीच त्यांना जोडे दाखवतील. तर राहूल गांधी यांचे नाव न घेता शिंदे यांनी टीका केली. राहूल गांधी विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. पण मोदी बाहेरच्या देशात जाऊन देशाची शान वाढवतात, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com