Lakhpati Didi : ११ लाख लखपती दिदींना पंतप्रधान मोदी देणार प्रमाणपत्र; जळगावमध्ये आयोजित कार्यक्रमात वाटप

लखपती महिलांना प्रमाणपत्र देणार आहेत. तर या कार्यक्रमाला देशभरातील ३० हजार महिला ऑनलाईन हजेरी लावणार आहेत. या महिला वार्षिक एक लाखाहून अधिक कमाई करत असल्याकाही दावाही चौहान यांनी केला.
Lakhpati Didi
Lakhpati DidiAgrowon
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ ऑगस्ट रोजी ११ लाख लखपती महिलांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातील ३ कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाचा एक भाग म्हणून महिलांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

याबद्दल केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "पंतप्रदहण नरेंद्र मोदी २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात लखपती महिलांशी संवाद साधणार आहेत. तसेच २ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी सावर्जनिक गुंतवणूक निधीत जमा करणार आहेत. त्याचा लाभ ४.३ लाख बचत गटांना आणि ४८ लाख सदस्यांना मिळणार आहेत," असा दावा चौहान यांनी केला.

देशातील २ लाख ३५ हजार ४०० बचत गटांतील २५ लाख ८ हजार सदस्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ हजार कोटींचा कर्ज वाटपास मान्यता देणार आहेत. तसेच लखपती महिलांना प्रमाणपत्र देणार आहेत. तर या कार्यक्रमाला देशभरातील ३० हजार महिला ऑनलाईन हजेरी लावणार आहेत. या महिला वार्षिक एक लाखाहून अधिक कमाई करत असल्याकाही दावाही चौहान यांनी केला.

चौहान पुढे म्हणाले, "देशातील १ कोटी महिलांना लखपती बनवलं आहे. आता पुढील ३ वर्षात ३ कोटी महिलांना लखपती बनवणं आमचं उद्दिष्ट आहे." असंही चौहान यांनी सांगितलं. यावेळी बचत गटातील महिलांच्या कुटुंबांना एक लाखांहून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी सक्षम केलं आहे. त्यासाठी प्रशिक्षण घेण्यात येत आहे. प्रशिक्षक महिलांना प्रशिक्षित करत आहेत. त्यातून ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहित केलं जात आहे, असा केंद्र सरकारचा दावा आहे.

Lakhpati Didi
Maharashtra Band : महाविकास आघाडीच्या 'महाराष्ट्र बंद'ला उच्च न्यायालयाचा दणका; बंद पुकारणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारकडून विविध घोषणा केल्या जात आहेत. तसेच शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com