Safflower Variety : करडईच्या दोन वाणास देश पातळीवर मान्यता

Oilseed Crop Variety : या वाणांच्या विकासामध्ये पैदासकार डॉ. एस. बी. घुगे, डॉ. आर. आर. धुतमल तसेच करडई प्रकल्पातील वैज्ञानिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
Safflower Variety
Safflower Variety Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी येथील अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्पअंतर्गत विकसित केलेल्या पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) आणि पीबीएनएस १८४ या दोन वाणांचे देश पातळीवर क्षेत्र वाढीस केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पीक गुणवत्ता, वाण अधिसूचना व प्रसारण समितीच्या ९३ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

या वाणांना महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये (झोन-१) लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. तर पीबीएनएस १८४ वाणाला झोन-२ अंतर्गत इतर प्रमुख करडई उत्पादक राज्यांमध्येही लागवडीसाठी मान्यता देण्यात आली आहे.

कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मणी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, विद्यापीठ प्रशासनाच्या सहकार्याने हे यश प्राप्त झाले आहे.

Safflower Variety
Safflower, Rabbi Jowar Production : करडई, रब्बी ज्वारीच्या उत्पादनात नांदेडचा राज्यात डंका

या वाणांच्या विकासामध्ये पैदासकार डॉ. एस. बी. घुगे, डॉ. आर. आर. धुतमल तसेच करडई प्रकल्पातील वैज्ञानिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. पैदासकार शास्त्रज्ञांचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले, करडईचे हे दोन अधिक उत्पादनक्षम व गुणवत्तापूर्ण आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल.

Safflower Variety
Safflower Sowing : रब्बी हंगामात करडईची पेरणी वाढली

डॉ. बेग म्हणाले, की या वाणांचे बियाणे लवकरच राष्ट्रीय स्तरावर उत्पादनासाठी व विक्रीसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना नवे पर्याय उपलब्ध होतील. पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) या वाणाला ६ मार्च २०२३ रोजी तर पीबीएनएस १८४ वाणाला ३१ ऑगस्ट २०२२ रोजी अधिसूचित करण्यात आले होते.

करडई वाणांची प्रमुख वैशिष्ट्ये

पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा)

हा वाण १२४ ते १२६ दिवसांत परिपक्व होतो. कोरडवाहू क्षेत्रात प्रतिहेक्टरी १० ते १२ क्विंटल उत्पादन क्षमता आहे. तेलाचे प्रमाण सुमारे ३०.९० टक्के असून बाजारात चांगली मागणी आहे. हा वाण मावा किडीस प्रतिकारक्षमता, पानावरील ठिपके व मर रोगांवरील सहनशील आहे.

पीबीएनएस १८४ ः

हा वाण १२० ते १२४ दिवसांत परिपक्व होतो. कोरडवाहू क्षेत्रात प्रतिहेक्टरी १२ ते १५ क्विंटल तर बागायती क्षेत्रात प्रतिहेक्टरी १८ ते २० क्विंटल उत्पादन क्षमता आहे. तेलाचे प्रमाण ३१. ३ टक्के आहे. मर रोगास व मावा किडीस प्रतिकारक्षम तर पानावरील ठिपके रोगास सहनशील आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com