Pakistan Drone Attack : पाकिस्तानने भारताची वायु हद्द ओलांडून ३६ ठिकाणी केला ड्रोन हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

Drone Strike : पाकिस्तानने भारतावरील हल्ल्यासाठी तुर्कीचे सिस गार्ड सोंगर ड्रोन वापरले. पाकिस्तानने जम्मू, पुंछ, राजौरी, अखनूर आणि उधमपुरमध्ये सशस्त्र हल्ले करून नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. यामध्ये भारतीय लष्करातील काही सैनिक गंभीर जखमी झाले, अशीही माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
Pakistan Drone Attack : पाकिस्तानने भारताची वायु हद्द ओलांडून ३६ ठिकाणी केला ड्रोन हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती
Agrowon
Published on
Updated on

Cross-border strike : पाकिस्तानने ८ आणि ९ मेला रात्रीच्या दरम्यान भारतीय वायु क्षेत्राचं अनेकदा उल्लंघन करून ३६ ठिकाणी ४०० ड्रोनचा वापर करून हल्ला केला, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी शुक्रवारी (ता.९) पत्रकार परिषदेत दिली.

पाकिस्तानच्या हल्ल्याची माहिती देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद आयोजित केली. यावेळी परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिस्त्री उपस्थित होते. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जगाचं लक्ष दोन्ही देशांकडे लागलं आहे.

Pakistan Drone Attack : पाकिस्तानने भारताची वायु हद्द ओलांडून ३६ ठिकाणी केला ड्रोन हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती
India Pakistan War: महाराष्ट्रात ‘हाय अलर्ट’; महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली

पाकिस्तानने भारतावरील हल्ल्यासाठी तुर्कीचे सिस गार्ड सोंगर ड्रोन वापरले. पाकिस्तानने जम्मू, पुंछ, राजौरी, अखनूर आणि उधमपुरमध्ये सशस्त्र हल्ले करून नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. यामध्ये भारतीय लष्करातील काही सैनिक गंभीर जखमी झाले, अशीही माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

पाकिस्तानच्या हल्लाला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानमधील चार हवाई सुरक्षा केंद्रांवर सशस्त्र ड्रोनचा मारा करण्यात आला. यामधील एका ड्रोनने पाकिस्तानचं एडी रडार उद्ध्वस्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच पाकिस्तानचे बेजबाबदार वर्तन पुन्हा उघड झालं आहे, असंही कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या.

पाकिस्तानने धार्मिक स्थळांवर हल्ले केल्याचं परराष्ट्र सचिव म्हणाले. पाकिस्तानने एका ख्रिश्चन शाळेला आणि गुरुद्वाराला लक्ष्य केलं. ख्रिश्चन शाळेवर केलेल्या हल्ल्यामध्ये २ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पाकिस्तान रात्री ८ वाजता ड्रोन आणि मिसाईल हल्ला केल्यानंतर नागरी हवाई क्षेत्र बंद केलं नाही. नागरी विमानांना ते ढाल म्हणून वापर करत असल्याचं परराष्ट्र सचिव म्हणाले.

Pakistan Drone Attack : पाकिस्तानने भारताची वायु हद्द ओलांडून ३६ ठिकाणी केला ड्रोन हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती
India-Pak Water Management: सिंधू करार, गोदी मीडिया आणि पाकिस्तान

तसेच पाकिस्तानने भारताची वायू सीमा ओलांडली. त्यावेळी भारताकडून चार ड्रोनच्या माध्यमातून प्रतिहल्ला करण्यात आला.  भारतीय लष्कराने मात्र कायनेटिक आणि नॉन कायनेटिक शस्त्रांचा वापर करून पाकिस्तानचे ड्रोन पाडले. वायु प्रणाली सुरक्षा आणि गुप्त माहिती एकत्र करण्याचा उद्देश यामागे होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com