Farmer And Soldier : एक अन्नदाता तर दुसरा जीव रक्षिता

देश म्हणजे देशातील माणसे. देश दगड-धोंड्यांनी नाही तर माणसांनी बनतो. निसर्ग देशाला पर्यावरण पुरवतो, चैतन्य देतो, सौंदर्य बहाल करतो. पण देश कोण जगवतो. देशाचं रक्षण कोण करतो. अन्नदाता घास भरवतो, त्याला आपण किसान म्हणतो. सीमेवर थांबून शत्रूपासून रक्षण करतो, त्याला आपण जवान म्हणतो.
Jai Jawan Jai Kisan
Jai Jawan Jai KisanAgrowon
Published on
Updated on

रामदास वाघ

९४०३४३५२१०

देश म्हणजे देशातील माणसे. देश दगड-धोंड्यांनी नाही तर माणसांनी बनतो. निसर्ग (Nature) देशाला पर्यावरण (Environment) पुरवतो, चैतन्य देतो, सौंदर्य बहाल करतो. पण देश कोण जगवतो. देशाचं रक्षण कोण करतो. अन्नदाता (Food Provider) घास भरवतो, त्याला आपण किसान म्हणतो. सीमेवर थांबून शत्रूपासून रक्षण करतो, त्याला आपण जवान (Soldier) म्हणतो. आपण या दोघांना वगळलं तर शेती कोण करेल, सीमेवर बंदूक घेऊन कोण उभा राहील. या दोघांना वगळलं तर जीवन शून्यवत होईल. अन्न आणि सुरक्षा या दोन गोष्टी जगण्यासाठी आवश्यक आहेत.

Jai Jawan Jai Kisan
Indian Agriculture : शेती शिक्षणात शेती शोषणाचा इतिहास मांडला जातो का ?

शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो. थंडी, ऊन, वारा पावसात राबराब राबतो. आपल्यासाठी अन्न उगवतो. वरुणराजा बरसतो. शेतकरी साश्रू नयनांनी आकाशातील देवाकडे समाधानाने पाहतो. खळ्यातील धान्याची रास पुजतो. गोरगरिबांना मुक्त हस्ते दान देतो. जगाला भरवतो. गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील स्मित पाहून सुखावतो. माझ्या देशातील माणूस पोटभर खाईल, तेव्हाच देशाची भरभराट होईल हे तो जाणून असतो. म्हणून त्याला अन्नदाता म्हणतात. हा अन्नदाताच खऱ्या अर्थाने देश जगवतो.

Jai Jawan Jai Kisan
Indian Agriculture : आपल्याला तारणारी शेती पद्धती

सैनिक देशाचं, देशातील माणसांचे रक्षण करतो. घर-दारापासून मुलां-बाळांपासून दूर सीमेवर उभा असतो. कधी कधी त्याला वेळेवर अन्न पाणी मिळत नाही. थंडी, ऊन, वारा पावसात कशाचीही तमा न बाळगता कर्तव्य पार पाडतो. एकच स्वप्न असतं त्याचं, देशाचं रक्षण. एकच गीत असतं त्याचं, देश हा देव असे माझा. किसान आणि जवान याचे महत्त्व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ओळखलं होतं. म्हणून त्यांनी ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला. देशातील लोकांना सांगितलं, की बंधूंनो, भारतमातेच्या सुपुत्रांनो, आपण आपल्या घरात बसून आपल्या लेकरा बाळांसोबत गप्पा मारत आनंदाने श्‍वास घेत आहोत. थंडी, ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून सुरक्षित आहोत.

Jai Jawan Jai Kisan
Indian Agriculture : तेणे मुक्ती चारी साधियेल्या...

सीमेवर शत्रू आपल्या प्रिय देशावर हल्ला करीत आहे. आपल्या देशाचे जवान त्यांच्या हल्ल्याला तोंड देत देशाचे म्हणजे आपले रक्षण करीत आहेत. सांगा, त्यांची अवस्था काय असेल. अन्न मिळत असेल का त्यांना? मिळाले ते पुरेसे असेल का? आणि ते खाण्यास त्यांना वेळ असेल का? भूक तहान विसरून, घरदार विसरून, माय-बाप लेकरं-बाळ विसरून ते फक्त लढत आहेत, भारत मातेचे रक्षण करण्यासाठी! भारतमातेचे रक्षण हेच त्यांचे अंतिम ध्येय आहे. सांगा त्यांच्या त्यागाची किंमत करता येईल का कोणाला? तसेच आपल्यासमोर वाढलेले ताट पाहा, ताटातील प्रत्येक वस्तू पाहा, ती पिकविण्यासाठी किसान रात्रंदिवस कष्ट करतो. रक्ताचे पाणी करतो. हाडाची काडे करतो. काटेकुटे तुडवतो. देशाला आपल्याला अन्न पुरवतो.

ताटातल्या प्रत्येक घटकासाठी जीव ओतून मेहनत करतो. एक जीव जगवतो तर दुसरा जीव रक्षतो. या दोन महात्म्यांच्या त्यागापुढे जगातील सर्व संपत्ती थिटी आहे. सर्व वैभव कवडीमोल आहे. म्हणून जवान जगला पाहिजे. किसान जगला पाहिजे. तो उद्‍ध्वस्त झाल्यावर, त्याचं कुटुंब आपण जगवलं पाहिजे. सामुदायिकरीत्या गावाने म्हणा का शहराने अशा जवानांच्या आणि किसानांच्या कुटुंबांना दत्तक घेतले पाहिजे. त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी पालन-पोषणासाठी शासनाने आणि स्थानिक नागरिकांनी योगदान दिले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने त्यांनी केलेल्या देश सेवेच्या ऋणातून आपण मुक्त होऊ. तरच आपल्याला ‘जय जवान जय किसान’ म्हणण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होईल.

लाल बहादूर शास्त्री यांची तळमळ आपण समजून घेतली पाहिजे. सीमेवर लढणारा सैनिक आणि शेतात राबणारा शेतकरी किती महान असतो, हे शास्त्रीजींनी आपल्या पोटतिडकीच्या भाषणातून आपणास पटवून दिले आहे. प्रत्यक्ष सीमेवर लढणारा सैनिक शत्रूचा सामना करताना मनातल्या मनात म्हणत असतो, सीमेवर शत्रूसमोर उभा राहून त्याच्या गोळीबाराचा सामना करताना मला फक्त दिसते माझी भारतमाता. तिच्या रक्षणासाठी तिच्या लेकरांच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणे एवढेच ध्येय मला दिसते.

माझ्या पाठीमागे माझे देश बांधव काय करतात याचा विचार सुद्धा शिवत नाही, माझ्या मनाला. मला माहीत एकच आहे, माझ्या पाठीमागे सुंदर संस्कृतीचा थोर वारसा आहे. शहिदांच्या बलिदानाचा इतिहास आहे आणि माझ्या प्रिय भारतमातेचा अमृततुल्य आशीर्वाद आहे. तोवर अमाप बळ माझ्या बाहूत, आत्म्यात आणि हृदयात आहे. तसेच अवर्षणग्रस्त भागातील शेतकरी म्हणतो, बाबा रे वरुणराजा, माझ्या लेकरांसाठी नको पण दुनियादारीसाठी बरस रे बाबा. त्याची पत्नी म्हणते, शेतकरी जगाचा पोशिंदा असतो, त्याने भरवलेल्या जगाला जगवण्यासाठी बरस रे बाबा. सैनिक व शेतकरी किती महान असतात, हे आपण समजून घेतले पाहिजे. सैनिक व सैनिकाचे कुटुंब आणि शेतकरी व शेतकऱ्यांचे कुटुंब यांना मी त्रिवार वंदन करतो.

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com