डॉ. बाळासाहेब सोनवलकर
Mulberry Fodder Crops :
शेळी, मेंढीपालन व्यवसायातील फायदेशीर उत्पादन योग्य खाद्य पुरवठा आणि व्यवस्थापनावर अवलंबून असते. योग्य खाद्य व्यवस्थापनामध्ये पौष्टिक अन्न, जीवनसत्त्वे, खनिजे, ऊर्जा, प्रथिने इत्यादींचा समावेश होतो.
शेळी, मेंढ्यांच्या आहारात पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे, हिरवे खाद्य आणि खनिजे असावीत. खाद्य कधीही ओलसर-दूषित होऊ देऊ नये. शेवरी, सुबाभूळ, बोर, वड, अंजन, बाभूळ, पिंपळ तसेच तुतीची पाने शेळ्या, मेंढ्यांना आवडतात. चाऱ्यासाठी तुतीची लागवड निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. तुतीची दरवर्षी लागवड करावी लागत नाही. त्यामुळे खर्चात बचत होते. एप्रिल, मे महिन्यात कमी पाण्यात तुती जगते. कीड, रोगांचा फारसा प्रादुर्भाव दिसत नाही. नेहमीच्या चाऱ्यामध्ये तुतीच्या पानांचे मिश्रण करावे. यामुळे पुरेशा प्रमाणात पौष्टिक घटकांचा पुरवठा होतो.
तुतीचा पाला फायदेशीर
तुती लागवड प्रामुख्याने रेशीम शेतीसाठी केली जाते. यातून अतिरिक्त उत्पादित पाने शेळी, मेंढीसाठी खाद्य म्हणून फायदेशीर ठरतात. ही पाने परिपूर्ण खाद्य पूरक आहेत.
तुतीची पाने आपल्या हवामानात चांगली वाढतात. पानांमध्ये सुमारे २० टक्के प्रथिनांसह पौष्टिक मूल्य असते.
तुती पानांची उच्च पचनक्षमता आहे. पानांचा आहारात समावेश केल्याने दुधाचे प्रमाण वाढते. दुधाची गुणवत्ता सुधारते. कोकरू आणि शेळ्यांच्या शरीराचे वजन वाढते. त्यामुळे तुतीची पाने शरीराच्या वाढीसाठी पोषक ठरतात.
तुतीच्या पानांमध्ये कच्च्या प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. तंतूमय कमी प्रमाणात असतात.
डॉ. बाळासाहेब सोनवलकर, ७७०९८१२६४५
(पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय, कडेगाव, जि. सांगली)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.