विजय सांबरेStatistical Review of Agricultural Losses: पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेतील शाश्वत विकास केंद्राने ‘मानव व वन्यजीव संघर्ष: शेती नुकसानीचा सांख्यिकीय आढावा’ या नावाने एक राज्यव्यापी अहवाल सादर केला. विविध उपद्रवी वन्यजीवांमुळे शेतीचे होणारे नुकसान व त्याचा शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर होत असलेला दूरगामी परिणाम, याविषयी नव्याने चर्चा सुरु झाली. वन्यजीवांच्या जाचामुळे तब्बल ६२ टक्के त्रस्त शेतकऱ्यांनी शेती कसणे कमी केले आहे व सुमारे ५४ टक्के शेतकऱ्यांनी नाइलाजाने एक पीक घेणे थांबवले आहे. सरकारची नुकसान भरपाई देणारी व्यवस्था अपुरी पडत आहे...असे अनेक चिंताजनक निष्कर्ष या अहवालातून पुढे आले आहेत. .‘महाराष्ट्रात वन्य प्राण्यांमुळे शेतीचे ४० हजार कोटींचे नुकसान’ या मथळ्याची बातमीऑक्टोबरच्या सुरुवातीला सर्वच प्रमुख वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली आणि पुन्हा एकदा मानव व वन्यजीव संघर्षाची जोरदार चर्चा सुरु झाली. पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेतील शाश्वत विकास केंद्राने ‘मानव व वन्यजीव संघर्ष: शेती नुकसानीचा सांख्यिकीय आढावा’ या नावाने एक राज्यव्यापी अहवाल सादर केला..विविध उपद्रवी वन्यजीवांमुळे शेतीचे होणारे नुकसान व त्याचा शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर होत असलेला दूरगामी परिणाम, याविषयी नव्याने चर्चा सुरु झाली. वन्यजीवांच्या जाचामुळे तब्बल ६२ टक्के त्रस्त शेतकऱ्यांनी शेती कसणे कमी केले आहे व सुमारे ५४ टक्के शेतकऱ्यांनी नाइलाजाने एक पीक घेणे थांबवले आहे. सरकारची नुकसान भरपाई देणारी व्यवस्था अपुरी पडत आहे... असे अनेक चिंताजनक निष्कर्ष या अहवालातून पुढे आले आहेत..विशेषत: उपद्रवी वन्यजीवांमुळे हजारो कोटींचे नुकसान होते हे गंभीर तर आहेच, पण गावखेड्यातील शेतकरी व इतर जन समुदायांच्या सुरक्षिततेचा प्रश्न बिकट होत आहे. त्यात लहान मुले, वृद्ध, भटके पशुपालक इ. घटक बळी पडत आहे..मानव व वन्यजीव: एक जैवसांस्कृतिक सहचर्यदेवू वाघ राजा, तुला मानाची आरतीगावाच्या येशिला तूही चंदनी मुरतीदेवू वाघ राजा तूही रावदे सावलीचांदण्याराती तुयी सवारी पायलीदेवू वाघ राजा उभ्या रानाचा राखणतुह्याविना देवा आमची कसाई राखण.सह्याद्रीतील आदिवासी महिलांचे हे लोकगीत अतिशय बोलके आहे. आदिवासींचे ढाण्या वाघाशी असणारे सेंद्रिय नाते सांगते. तो रक्षणकर्ता क्षेत्रपाळ देव आहे व त्याच्याशिवाय आमच्या रानाचे म्हणजेच जंगलाचे रक्षण कसे होईल? अशी हाक महादेव कोळी महिला पिढ्यानपिढ्या घालत आहेत. एकूणच ग्रामीण महाराष्ट्राची निसर्गपूजक संस्कृती समजून घेतली, तर वन्यजीव व गावसमाज यांच्यातील सहजीवन उलगडू लागते..Human Wildlife Conflict: समतोलातून टाळता येईल संघर्ष.वन्यजीवांचा जाच चोहीकडेआजघडीला मानव व वन्यजीवांतील सहचर्य नष्ट होत आहे. महाराष्ट्राचा कानाकोपरा उपद्रवी वन्यप्राण्यांनी त्रस्त आहे. दररोज वर्तमानपत्रे, खासगी वाहिन्या व समाजमाध्यमांमधून विविध वन्यजीवांचा माणसावर, पाळीव प्राण्यांवर हल्ला वा पिकाच्या नासाडीच्या बातम्या आपण पाहतो. महाराष्ट्रातील एकूण नऊ कृषी-हवामान विभागांत या समस्येचे स्वरूप विभिन्न व नुकसान मोठे आहे..विदर्भातील जंगल बहुल जिल्ह्यांत वाघाचे हल्ले नेहमीचे झालेत. वनउपजासाठी जंगलात जाणाऱ्या महिला, पुरुष व शेतात काम करणारे शेतकरी यांच्यावर दररोज कुठेना कुठे जीवघेणे हल्ले होत आहेत. डोंगर व जंगलानजीकची पिके रानडुक्करे नष्ट करत आहेत. वीस-पंचवीस वर्षापूर्वी ऊस बागायत पट्ट्यात स्थलांतरित झालेले बिबटे (बिबळे) ही तर मोठी डोकेदुखी बनली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, राहाता व राहुरी हे तालुके बिबट्यांच्या हल्ल्यामुळे अतित्रस्त झाले आहेत..सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सांबरामुळे पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. सह्याद्रीच्या उपरांगांत मोरामुळे रब्बी हंगामातील कडधान्य हाती येत नाही. तिकडे तळकोकणात ठाणे जिल्ह्यात शहापूर व मुरबाड मध्ये नीलगायींची संख्या इतकी झपाट्याने वाढली आहे की, तिथे शेती करणेच अशक्य होऊन बसले आहे. जोडीला चितळ व रानडुक्करे तर आहेतच..दक्षिण महाराष्ट्रात कृष्णाकाठी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत मगरींचा सुळसुळाट वाढला आहे. ऊस व इतर बागायतात भर दिवसा फिरायला भीती वाटते. दक्षिण कोकण कर्नाटक-गोवा तसेच छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर हत्तीचा उपद्रव वाढतोच आहे. एकूणच पिके, पाळीव प्राणी व मानव यांचे मोठे नुकसान वन्यजीवांमुळे होत आहे व खुद्द वन्यजीव पण या संघर्षात बळी पडत आहे. या पार्श्वभूमीवर वन विभाग मात्र हतबल झाल्याचे दिसते..उत्तर सह्याद्री व कोकणातील अभ्यासाचे निष्कर्षप्रस्तुत लेखकाने उत्तर सह्याद्रीतील कळसूबाई-भीमाशंकर, कोकण व सह्याद्रीच्या उपरांगातील भूप्रदेशांत प्रत्यक्ष प्रवास करून मानव व वन्यजीव संघर्षाची सद्यःस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातील निष्कर्ष खालीलप्रमाणे, अभ्यास क्षेत्रात खरीप रब्बी व उन्हाळी हंगामात एकूण १५ प्रकारची पिके व १० प्रकारचे पाळीव प्राणी यांचे नुकसान ८ प्रकारचे उपद्रवी वन्यजीव सातत्याने करतात. त्यात तृणभक्षी व मांसाहारी रानटी प्राण्यांचा समावेश होतो. रानडुक्कर, सांबर, हरिण, वानर, नीलगाय, गवा, तरस, बिबटे हे मुख्य उपद्रवी वन्यजीव आहेत..वन्यजीवांकडून प्रामुख्याने भात (८३ टक्के) व भाजीपाला (९१ टक्के) या नगदी पिकांचे सर्वाधिक नुकसान होते.बिबट्यांच्या हल्ल्यात मुख्यत: लहान मुले व वृद्ध यांचाच बळी जातो.वन्यजीवांचा हल्ला झाल्यावर ६० टक्के लोक प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार घेतात. डोंगराळ भागात प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत तातडीने पोहोचणे शक्य होत नाही. ११ टक्के बाधित लोकांना आरोग्याची सुविधा मिळत नाही.नमुना सर्वेक्षणानुसार ६७ टक्के लोक नुकसान भरपाईसाठी तोंडी तक्रार वा अर्ज करत नाही. केवळ २६ टक्के लोक वन विभागाकडे दाद मागतात.पीक नुकसानीच्या संदर्भात जवळपास ८० टक्के लोकांनी मागितलेली नुकसान भरपाई नाकारली जाते.बिबट्याच्या हल्ल्यात कोंबड्या मेल्या तर नुकसान भरपाई मिळत नाही.पाळीव प्राण्यांवर हल्ला झाला तर ४३ टक्के प्राण्यांना प्रथमोपचार मिळतो..अहिल्यानगर जिल्ह्यातील वन विभागाच्या आकडेवारीनुसार २००५ पासून बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २०२१ ते २०२४ या तीन वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला व ९१ लोक जखमी झाले. मानवी नुकसानीची भरपाई रक्कम रु. १५८४७२२४ देण्यात आली. या कालावधीत तब्बल ५२६० पाळीव प्राणी मृत पावले. त्यांची भरपाई रु. ५९२९०७७८ देण्यात आली. दुसऱ्या बाजूला विविध उपद्रवी वन्यजीवांनी ७४१ हेक्टर पिकांचे नुकसान केले व संबंधितांना रुपये ४६९४७१५ इतकी भरपाई दिली. एकूण ७ कोटी ४२ लक्ष ३२ हजार ६१७ रु. नुकसान भरपाई अहिल्यानगर वन विभागाने दिली आहे..प्रश्नातील गुंतागुंतमानव व वन्यजीव यांच्यात असणारे सहजीवन संघर्षात कसे बदलले? याची कारणमीमांसा गुंतागुंतीची आहे. दोघांमधल्या संघर्षाला नक्की जबाबदार कोण, याविषयी मते-मतांतरे आहेत. एक गोष्ट ठळक आहे की, अविवेकी विकास प्रक्रियेत वन्यजीवांचे पारंपारिक अधिवास नष्ट झाले, भ्रमणमार्ग खंडित झाले. परिणामी वन्यजीवांचे स्थलांतर सुरु झाले..सौम्य प्रमाणात वन्यजीव नुकसान करत होते, तोपर्यंत फारसे गांभीर्य नव्हते. पण जसजसे आर्थिक नुकसान वाढू लागले, वन्यजीवांचे हल्ले मानवावर होऊ लागले; त्यानंतर समाज वन्यजीवांना शत्रू मानू लागला. ग्रामीण भागातील भटके पशुपालक, पशुपालक शेतकरी, आदिवासी शेतकरी, वनोपज संकलक यांना सर्वप्रथम झळ बसू लागली. आजघडीला उपद्रवी वन्यजीवांचा प्रवेश लहानमोठ्या शहरात होऊ लागला आहे. सर्वच राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते उत्तर न शोधता एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण करण्यात धन्यता मानत आहेत. ही समस्या कोणालाही सखोलपणे जाणून घ्यायची नाही..Human Wildlife Conflict: बिबट्याला मारायची परवानगी द्या.वन्यजीव कायद्यात सुधारणा हवी१९७२ मध्ये संमत झालेल्या वन्यजीव संरक्षण कायद्याने सरसकट वन्यजीव शिकारीवर बंदी घातली व त्यातून पुढे मोठ्या समस्या निर्माण होऊ लागल्या. वन्यजीव कायदा होऊन तब्बल पाच दशके लोटली आहेत. या कायद्यामुळे काही प्रमाणात जंगल व वन्यजीव निश्चित वाचले असणार; पण अतार्किक, अशास्त्रीय नियंत्रणामुळे झपाट्याने वाढणारे उपद्रवी वन्यजीव, जे स्थानिक शिकार पद्धतीमुळे नियंत्रित होत होते, त्यांची संख्या वेगाने वाढली. थोडक्यात महत्त्वाचा वाघ व उपद्रवी रानडुक्कर यांना या कायद्याने समान न्याय (?) दिला. परिणामी उपद्रवी प्राण्यांचा उच्छाद सर्वदूर वाढला..हट्टी वन विभाग व फक्त वन्यप्राण्यांचीच काळजी करणाऱ्या वन्यजीवप्रेमींच्या दबावामुळे या प्रश्नाकडे सरकारने अनेक वर्षे डोळेझाक केली. वन्यजीव संरक्षण कायद्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन न झाल्याने मानव-वन्यजीव संघर्ष आज अखेर अनुत्तरीतच राहिला आहे. ‘जंगलावर व वन्यजीवांवर आमचीच मालकी,’ या फाजील भूमिकेमुळे सरकारी वनविभागाला सर्व आघाड्यांवर अपयश येते आहे, जनक्षोभाला बळी पडावे लागत आहे. या आव्हानात्मक पार्श्वभूमीवर सर्व घटकांना मिळून उत्तर शोधावेच लागणार आहे..सरकारी नुकसानभरपाई व्यवस्थावन्यजीव कायद्यानुसार सर्वच वन्यजीवांवर मालकी सरकारची असल्याने नुकसान भरपाई द्यायला शासकीय यंत्रणाच बांधील असतात. मानवी हल्ला झाला, पाळीव प्राण्यावर हल्ला झाला किंवा पिकांचे नुकसान झाल्यावर त्वरित वन विभागाला माहिती देणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने २०१० पासून २०२२ पर्यंत नुकसान भरपाई देण्याबाबत विविध शासन निर्णय (जीआर) जाहीर केले आहेत. त्यात उपद्रव करणाऱ्या वन्यजीवांची यादी पण दिली आहे. त्यानुसार मानवी हल्ले, पाळीव प्राण्यांवरील हल्ले व पीक नुकसान यासंबंधी विविध तरतुदी आहेत. त्या सर्वप्रथम समजून घेणे गरजेचे आहे. ते सरकारी संकेतस्थळावर / वेबसाइटवर उपलब्ध आहेत..सहजीवन कसे साधणार ?मानव व वन्यजीव संघर्षाचे सहजीवनात रूपांतर करता येणे शक्य आहे. त्यासाठी खालील बिंदूंच्या आधारे सर्वसमावेशक कृतिकार्यक्रम आखता येईल.परिसरशास्राच्या अंगाने एखाद्या परिसंस्थेत व अधिवासात वन्यजीव संख्या किती असावी, याचे मोजमाप व्हायला हवे.मानव व वन्यजीव संघर्षात सामान्य माणूस, शेतकरी, वन विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, सामाजिक संस्था, अभ्यासक, कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रसार माध्यमे इत्यादी घटकांनी समन्वयाने आपल्या भूमिका बजवाव्यात. त्यासाठी या घटकांना अधिक जागरूक व संवेदनशील बनणे पण आवश्यक आहे..उपद्रवी वन्यजीव याविषयी ग्रामसभांमध्ये सातत्याने चर्चा घडवून आणणे हे महत्त्वाचे पाऊल असणार आहे. स्थानिक पातळीवरील समस्येचे स्वरूप जाणून घेतले तर, विविध लोककेंद्री कायदे व पारंपारिक / सांस्कृतिक नियमांच्या चौकटीतून हा प्रश्न सोडवता येऊ शकेल.तातडीच्या उपाययोजना म्हणून नुकसान भरपाईची पद्धत अधिक सुलभ करणे, त्यातील अटीशर्थी सौम्य करणे हे अगत्याचे आहे.वन विभागाचे क्षेत्र व शेती यांचे सीमांकन निश्चित करणे. वन्यजीव शेतात वा वस्तीत येणार नाहीत, यासाठी वनपट्टे / अधिवास निर्माण करणे..वन्यजीवांपासून बचावासाठी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे व गाव-समाजाने वर्तणुकीचे सामुहिक नियम बनवणे व पाळणे गरजेचे आहे.वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मध्ये कालसुसंगत बदल करणे, यासाठी दबाव गट व अभ्यास गट निर्माण करणे. तसेच ‘नियंत्रित शिकार’ या पर्यायावर चर्चा घडवून आणणे व उपद्रवी वन्य प्राण्यांच्या नियंत्रित शिकारीचे प्रयोग करून त्याचे परिणाम अभ्यासणे.सरकारने गाव, तालुके, जिल्हा व राज्य पातळीवर वन्यजीवांमुळे होणारे विविध घटकांचे नुकसान याविषयी माहिती संकलन यंत्रणा स्थापन करणे व तिने आकडेवारी अद्ययावत ठेवणे.वन्यजीव प्रेमी अनेकदा केवळ प्रेमापोटी वास्तव समजून न घेता एकांगी मांडणी करतात व दुसऱ्या बाजूला परिसरशास्राचे अभ्यासक या प्रश्नी ठोस भूमिका घेत नाहीत. हा विपर्यास वा विरोधाभास थांबायला हवा..संघर्षातून सहजीवन, हे मुख्य ध्येय समोर ठेऊन वननीति / वन व्यवस्थापन आखले जावे. वन्यजीव सप्ताह व पर्यावरण विषयक कार्यक्रम साजरे करताना विविध घटकांचे प्रबोधन करावे.सर्वदूर अनेकदा मानव हाच उपद्रवी प्राणी ठरत आहे, हे कटुसत्य मान्य करणे गरजेचे आहे. फक्त मानवकेंद्री विकास व इतर सजीवांचे आम्हास काही घेणे देणे नाही, अशी एकांगी दृष्टी बाजूला सारून, निसर्गभान जपत शाश्वत विकास साधला तरच मानव व वन्यजीव सहवास प्रत्यक्षात उतरेल.जिज्ञासू वाचकांनी अधिक माहितीसाठी पुढील लिंक्सचा आधार घ्यावा१. https://www.sudharak.in/2025/06/14249/२. https://farmerandwildlife.com/wp-content/uloads/2025९४२१३२९९४४vijaysambare@gmail.com(लेखक शेती, पशुपालन व शाश्वत विकास या विषयांचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.