BJP Nagar News : नगरला भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी निवड हालचालींना वेग

Bharatiya Janata Party : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला आहे. प्रदेश पदाधिकाऱ्यांनी नवीन जिल्हाध्यक्ष निवडीबाबत कार्यकर्त्यांशी ते संवाद साधला असून त्यामुळे लवकरच निवडी होण्याची शक्यता आहे.
 BJP
BJPAgrowon

BJP Nagar Update : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला आहे. प्रदेश पदाधिकाऱ्यांनी नवीन जिल्हाध्यक्ष निवडीबाबत कार्यकर्त्यांशी ते संवाद साधला असून त्यामुळे लवकरच निवडी होण्याची शक्यता आहे. जिल्हाध्यक्षपद मिळण्यासाठी चांगलीच स्पर्धा लागली आहे.

भाजपकडून प्रत्येक तीन वर्षांनी जिल्हाध्यक्ष बदलले जातात. या वर्षी तीन महिने उशीर झाला आहे. त्यामुळे लवकरच निवडी होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्राने मोठा असल्यामुळे नगर जिल्ह्यात दक्षिण व उत्तर अशी विभागणी केली आहे. दक्षिण नगर जिल्ह्यात सध्या अरुण मुंडे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.

 BJP
BJP News : अकोला भाजपमध्ये अध्यक्षपदाच्या खांदेपालटाचे वारे वेगात

नव्याने दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष होण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश युवराज पोटे, सध्याचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, बाळासाहेब महाडीक यांची नावे चर्चेत आहेत. युवराज पोटे यांचे गेल्या अनेक वर्षाचे काम पाहता त्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहर जिल्हाध्यक्ष म्हणून भैया गंधे जबाबदारी पार पाडत आहेत.

नवीन जिल्हाध्यक्षपदासाठी गंधे यांच्यासह माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सचिन पारखी आदींची नावे इच्छुकांच्या चर्चेत आहेत.

उत्तर नगर जिल्ह्यात सध्या राजेंद्र गोंदकर जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. येथे गोंदकर यांच्यासह शिर्डीत नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, नितीन कापसे, प्रकाश चित्ते आदींची नावे चर्चेत आहेत. पक्षांतर्गत निवडी होताना संबंधितांचे काम पाहिले जाते. पक्षाचे वरिष्ठ नेते कार्यकर्त्यांशी संवाद साधून याबाबत निर्णय घेतात.

आगामी तीन वर्षांत महापालिका निवडणूक, जिल्हा परिषद, तसेच विधानसभा, लोकसभा निवडणुका आहेत. त्यामुळे या पदाला विशेष महत्त्व राहणार आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दृष्टीने भाजपचा जिल्हाध्यक्ष महत्त्वाचा असणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com