

Kolhapur News: ‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात येथील ज्योतिबाचा डोंगर शनिवारी (ता. १२) दुमदुमून गेला. चैत्र पौर्णिमेस दरवर्षी एप्रिलमध्ये ज्योतिबा डोंगरावर दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची विराट जत्रा भरते.
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून व परप्रांतातून सुमारे सहा-सात लाख भाविक या यात्रेसाठी आले होते. रणरणत्या उन्हात देहभान विसरून सासनकाट्यांची मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची अखंड उधळण करत दिवसभर यात्रेचा सोहळा उत्साहात साजरा झाला.
तहसीलदार माधवी शिंदे यांचे पती विकास जाधव हस्ते शासकीय अभिषेक झाला.
या वेळी पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे, देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवडी, ज्योतिबावरील ऑफिस इनचार्ज धैर्यशील तिवले उपस्थित होते. मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया केल्यामुळे मर्यादित लोकांना पूजेच्या वेळी प्रवेश देण्यात आला. देवस्थान समितीकडून पायथा ते ज्योतिबा डोंगर या मार्गावर मोफत बस सेवेची सोय करण्यात आली.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आदींसह विविध विभागांच्या प्रमुख अधिकऱ्यांच्या उपस्थितीत मानाच्या सासन काठ्यांचे पूजन झाले. डोंगरावर विविध भागातून आलेल्या मानाच्या १०८ सासनकाट्यांची मिरवणूक दुपारी काढण्यात आली. या वेळी जयघोषाचा उत्साह टिपेला गेला होता.
सीसीटीव्ही, ड्रोनची व्यवस्था
गर्दी नियंत्रणासाठी ११६ सीसीटीव्ही, चार ड्रोनची व्यवस्था करण्यात आली होती. सांगली, सातारा, पुणे ग्रामीण येथून ५० अधिकारी, ३०० पोलिस अंमलदार असा अतिरिक्त फौजफाटाही मागविण्यात आला . सुमारे २५ हजार वाहने पार्क करता येतील, अशी प्रशस्त व्यवस्थाही भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.