
Satara News : जावळी तालुक्यातील ५४ गावांचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न (Satara Water Issue) सोडविण्यासाठी बोंडारवाडी धरण मार्गी लावण्याचा चंग बांधलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasingh Raje Bhosale) यांच्या मागणीवरून एक टीएमसीचे धरण बांधण्याच्या अनुषंगाने आवश्यक सर्वेक्षण तातडीने करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी जलसंपदा विभागाच्या (Department of Water Resources) अधिकाऱ्यांना दिल्या. यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्यातील अडसर दूर झाला आहे.
मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार विधान भवनात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत बैठक झाली.
या वेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. भारत पाटणकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, मोहन कासुर्डे, संतोष गोटल, चैतन्य दळवी, आदिनाथ ओंबळे, संतोष ओंबळे, जगन्नाथ जाधव, हरिभाऊ शेलार, बंडोपंत ओंबळे, तसेच ग्रामस्थांसह जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव कपूर, प्रकल्प समन्वयचे सचिव मोहिते, कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक कपोले, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. हेमंत धुमाळ, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पासंदर्भात बैठक घेतली. जावळी तालुक्यातील ५४ गावांचा सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचे सांगून एक टीएमसी क्षमतेचे बोंडारवाडी धरण उभारण्यासाठी तातडीने सर्वेक्षण सुरू करावे.
त्यासाठी लागणार निधी जलसंपदा विभागामार्फत उपलब्ध करावा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.