
ICDP : स्थानिक क्षेत्रीय स्तरावरील सर्वेक्षण आणि एकात्मिक सहकारी विकास प्रकल्प (ICDP) योजनेतील निकष गृहीत धरून प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांची बलस्थाने, कमतरता, संधी, धोका यांच्या आधारे संस्थेच्या प्रगतीची पुढील दिशा ठरविणे आवश्यक आहे.
ग्रामीण गृहनिर्माण, रुग्णालये, आरोग्य सेवा, ऊर्जेच्या अक्षय, नवीन आणि अपारंपरिक स्रोत पद्धतीने वीज निर्मिती व ऊर्जा वितरण आणि सहकारी बँकिंग इत्यादी विकल्पांचा यामध्ये समावेश होतो. निवडलेल्या जिल्ह्यांसाठी स्थानिक संसाधने आणि गरजा लक्षात घेऊन सूक्ष्म नियोजन करण्यात येते.
या योजनेत प्रामुख्याने पॅकेजमध्ये स्वरूपात साहाय्य केले जाते. यामध्ये पायाभूत गरजा, व्यवसाय विकासासाठी निधी आणि मनुष्यबळ विकास यांचा समावेश होतो. शेतकरी उत्पादक संघटना (FPO) ही प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांसाठी (PACS) उपकंपनी स्वरूपात एक स्वतंत्र उपक्रम म्हणून राबविण्यासाठी विविध स्तरावर अभ्यास होणे आवश्यक आहे.
स्थानिक क्षेत्रीय स्तरावरील सर्वेक्षण आणि एकात्मिक सहकारी विकास प्रकल्प (ICDP) योजनेतील निकष गृहीत धरून प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांची बलस्थाने, कमतरता, संधी, धोका यांच्या आधारे संस्थेच्या प्रगतीची पुढील दिशा ठरविणे आवश्यक आहे.
प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या कायदेशीर
चौकटीचे काम आणि त्यातील बदल प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थेच्या कामकाजात लवचिकता आणण्यासाठी उपविधींमध्ये आवश्यक सुधारणा केल्या जाऊ शकतात. शेतकरी उत्पादक संघटना ही उपकंपनी स्वरूपात अस्तित्वात आणता येऊ शकते.
आगामी शेतकरी उत्पादक संघटनेला उपकंपनी म्हणून निधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला लवचिकता दिली जाऊ शकते. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तराखंड या राज्यात शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था यांना एकत्र आणण्यासाठी कायदेशीर चौकटीत बदल करण्याचे काम सुरू असून इतर राज्यात सुद्धा त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
समूह आधारित व्यवसाय संघटनांची भूमिका
आगामी शेतकरी उत्पादक संघटना आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था यांच्याशी संबंधित उपकंपनी उपक्रमांसाठी मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजेच कुशल मनुष्यबळ निर्मिती हा एक आव्हानात्मक पैलू असेल, ज्याला वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था, संबंधित भारतीय सहकार व्यवस्थापन संस्थांद्वारे आणि विभागीय स्तरावरील भारतीय सहकार व्यवस्थापन संस्थांद्वारे हाताळले जाऊ शकते.
प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था आणि त्यांच्या संचालक मंडळाची क्षमता बांधणी करण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटनेशी संबंधित सर्व नावीन्यपूर्ण कार्यक्रम चालविण्यासाठी या केंद्र शासनाच्या प्रशिक्षण संस्था पुढाकार घेतील. नेटवर्किंग, तांत्रिक साह्य भारतीय राष्ट्रीय सहकारी संघद्वारा संचलित प्लॅटफॉर्म, शेतकरी उत्पादक संघटना आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था यांच्या शाश्वत आणि विद्यमान यशोगाथांच्या साहाय्याने सदर कार्यक्रमास गती देण्यात येईल.
कृषी मूल्य साखळी विकास
आगामी एंटरप्राइझ उपकंपनी सामाजिक आणि आर्थिक दोन्ही स्तरांवर महत्त्वपूर्ण बदल करण्यात सक्षम असणे आवश्यक आहे. याकरिता स्थानिक पातळीवरील आवश्यक व्यवसाय विषयक गरजा ओळखून सहकारी आणि कंपनी या दोन्ही प्रकारांतील समूहाच्या गुणधर्माची चाचपणी करून पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.
आदिवासी उत्पादनाची मूल्य साखळी आणि उपजीविका विषयक मूल्य साखळी यांच्या आधारे सुद्धा उपकंपनी प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांसाठी आगामी शेतकरी उत्पादक संघटनेद्वारे शाश्वत व्यवसाय निर्मितीस साह्य करू शकते.
सहकारी संस्था आणि एफपीओ यांनी मिळून एक खरेदीदार संस्था म्हणून मर्यादित न राहता, त्यांनी संसाधन वाटप, व्यवस्थापन, दिशा, नफा आणि उपजीविकेची शाश्वतता यासाठी एकत्र किंवा एकत्रित राहून समन्वय साधण्याचे कार्य केले पाहिजे.
प्राथमिक कृषी सहकारी संस्था,
शेतकरी उत्पादक संघटनांचे एकत्रीकरण एकत्रीकरणामुळे शेतकऱ्यांना एक सर्वसमावेशक समर्थन प्रणाली उपलब्ध होऊ शकते, जी वित्त सेवा, विपणन संधी आणि तांत्रिक साह्य यांची एकत्रित सुविधा उपलब्ध करते. हा सर्वांगीण दृष्टिकोन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास आणि त्यांचे सर्वांगीण कल्याण करण्यास हातभार लावू शकतो.
बाजार प्रवेश आणि मूल्यवर्धन
शेतकरी उत्पादक संघटना या प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या प्रस्थापित बाजारव्यवस्थेचा आणि विविध व्यवसाय साखळ्यांचा फायदा घेऊ शकतात. या दोन्ही संस्थांचे एकत्रीकरण शेतकरी उत्पादक संघटनांना उत्तम बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यास, शेतीमालाच्या किमतींबाबत वाटाघाटी करण्यास आणि त्यांच्या कृषी उत्पादनाचे योग्य मूल्य ठरविण्यास सक्षम करू शकते.
ज्ञानाची देवाण-घेवाण आणि कौशल्य
प्राथमिक कृषी सहकारी संस्था त्यांच्या ग्रामीण वित्त क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्यासह, त्यांचे ज्ञान आणि व्यवसायाशी निगडित सर्वोत्तम पद्धती शेतकरी उत्पादक संघटनासोबत सहकार्य करून त्याची यशस्वी अंमलबजावणी करू शकतात.
शेतकरी उत्पादक संघटनांना आर्थिक व्यवस्थापन, जोखीम मूल्यमापन आणि प्रशासन यांसारख्या क्षेत्रात प्राथमिक कृषी सहकारी संस्था मदत करू शकते व त्या माध्यमातून संघटनेची कार्यक्षमता मजबूत होऊ शकते.
सुविधांचा सुयोग्य वापर
दोन्ही संस्थांच्या एकत्रित कामकाजामुळे आर्थिक संसाधने, पायाभूत सुविधा आणि तांत्रिक कौशल्यासह त्यांच्याकडील सुविधांचा एकत्रित उपयोग करू शकतात.
प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक संघटना यांच्यामधील संसाधने व सुविधा सामायिकरीत्या उपयोगात आणल्याने संस्थांची कार्यक्षमता वाढू शकते.
नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाचा अवलंब
प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक संघटना एकत्रित केल्याने नावीन्यपूर्ण पद्धती आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करणे सुलभ होऊ शकते.
यामुळे सुधारित कृषी उत्पादकता, कार्यक्षम पुरवठा साखळी आणि उत्तम बाजारपेठेत प्रवेश होऊ शकतो, ज्यामुळे कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण वाढ आणि विकासास हातभार लागू शकतो.
प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक संघटना एकत्रित काम कृषी कर्जामध्ये सहकार्य प्राथमिक कृषी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संघटना आणि त्यांच्या सदस्यांना सवलतीच्या दरात आणि लवचिक अटींवर कर्जपुरवठा आणि इतर सेवा देऊ शकते. यामुळे शेतकरी उत्पादक संघटनेला त्यांच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यास मदत होऊ शकते.
उत्तम संपर्क
अधिक शेतकरी आणि बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटना प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या विद्यमान सभासदांचा संपर्क आणि संस्थेच्या पायाभूत सुविधांचा लाभ घेऊ शकतात. यामुळे शेतकरी उत्पादक संघटनेला त्यांचा व्यवहारातील खर्च कमी करण्यास आणि त्यांची कार्यक्षमता वाढविण्यात मदत होऊ शकते.
सामूहिक विपणन
प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या त्यांच्या शेतीमाल उत्पादनासाठी चांगली किमत आणि गुणवत्ता मिळवून शेतकरी उत्पादक संघटनांच्या सामूहिक विपणन आणि मूल्यवर्धन विकल्पांचा फायदा घेऊ शकतात. यामुळे प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना त्यांचा आर्थिक नफा वाढविण्यास मदत होऊ शकते.
सामाजिक भांडवलाचा लाभ
शेतकरी उत्पादक संघटनाचे सामाजिक भांडवल आणि प्राथमिक कृषी सहकारी संस्थांवरील शेतकऱ्यांमध्ये असलेल्या विश्वासाचा फायदा या दोन्ही संस्थांना त्यांच्या प्रशासनात आणि निर्णय घेण्यामध्ये उपयोगी ठरू शकतात.
आर्थिक सहकार्य
प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक संघटनांच्या संयुक्तपणे मधमाशी पालन, अळिंबी लागवड, हातमाग, हस्तकला, पर्यटन, प्रसार माध्यम, शिक्षण आणि आरोग्य यांसारखे उच्च उत्पन्न देणारे उपक्रम हाती घेऊ शकतात.
सुविधा आणि तांत्रिक कौशल्यासह त्यांच्याकडील सुविधांचा एकत्रित उपयोग करू शकतात.
प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक संघटना यांच्यामधील संसाधने व सुविधा सामायिकरीत्या उपयोगात आणल्याने संस्थांची कार्यक्षमता वाढू शकते.
नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाचा अवलंब
प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक संघटना एकत्रित केल्याने नावीन्यपूर्ण पद्धती आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करणे सुलभ होऊ शकते.
यामुळे सुधारित कृषी उत्पादकता, कार्यक्षम पुरवठा साखळी आणि उत्तम बाजारपेठेत प्रवेश होऊ शकतो, ज्यामुळे कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण वाढ आणि विकासास हातभार लागू शकतो.
-महेश कदम, ९३५९१४५७७६
(सहयोगी प्राध्यापक, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी
व्यवस्थापन संस्था, पुणे)
- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०
(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ,
प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी,
स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.