
Osmanabad Agricultural Exhibition ः कमी खर्चात शेतीचे उत्पन्न (Agriculture Income) वाढविणे. सेंद्रिय शेतीला (Organic Farming) प्राधान्य देणे, सौरविद्युत पंपासह दुग्ध व्यवसायातील (Dairy Business) मुक्त-संचार गोठा, दर्जेदार बियाणे यासह विविध आधुनिक शेतीचे दर्शन घडवणाऱ्या शहरातील कृषी प्रदर्शनास जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शुक्रवारी (ता. १०) सुरू झालेल्या प्रदर्शन मंगळवारपर्यंत सुरू राहणार आहे. प्रदर्शनात गेल्या तीन दिवसापासून मोठ्या संख्येने शेतकरी विविध तंत्रज्ञानाची माहिती घेत आहेत.
वाढता उत्पादन खर्च, यामुळे शेती सतत तोट्यात जाते. त्याला पर्याय म्हणून शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे हा एक मार्ग सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पुढे येत आहे.
रासायनिक खतांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मानवी शरीरावर होणारी दूरगामी परिणाम होतात. यामुळे सेंद्रिय शेतीचे आकर्षण अनेकांच्या मनात रुजत आहे. त्यामुळे अशा उत्पादनाला मागणीही मोठ्या प्रमाणात येते आहे.
त्यासाठी सेंद्रिय शेतीतील तंत्रज्ञान या कृषी प्रदर्शनात अनेकांचे आकर्षण ठरत आहे. याशिवाय गेल्या चार-पाच वर्षांमध्ये जिल्ह्यातील सोयाबीन हे प्रमुख पीक बनलं असून चांगल्या उत्पादन देणाऱ्या विविध वाणांचा शेतकरी वर्गाकडून वापर केला जात आहे.
त्यासाठी अनेक शेतकरी बियाण्यांची कसून चौकशी करीत आहेत. बदलत्या काळात वीजेचा प्रश्न गंभीर होत असून शेतीपंपांचा वीज पुरवठाही शेतकऱ्यांसह शासनाला डोकेदुखी ठरत आहे. अशा परिस्थितीत सौरविद्युत पंपाबाबत शेतकरी आवर्जून जाणून घेत आहेत.
शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय हे प्रमुख आधार मानले जातात. दुग्धव्यवसायातील मुक्त संचार पद्धतीचा गोठा, मुरघासनिट अशा विविध उत्पादनास शेतकरी वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
जिल्हा द्राक्षाचे उत्पादनही चांगल्या प्रमाणात होत असून सेंद्रिय द्राक्ष उत्पादन, गूळ उत्पादन याबाबत ही शेतकरी मोठ्या आशेने प्रदर्शनात येऊन माहिती घेत आहेत. रेशीम शेतीला जिल्ह्यात चालना मिळत असून जिल्हाधिकारी प्रशासनाने रेशीम शेतीवर भर दिला आहे.
त्यासाठी दहा हजार हेक्टर वर लागवड करण्याचं नियोजन करण्यात आले असून त्याबाबत अनेक शेतकरी सध्या प्रदर्शनातून रेशीम शेतीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत प्रदर्शनात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आहेत.
शेतकऱ्यांचा प्रतिसाद
श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवास २२१ स्टॉल आहेत. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, खते, बियाणे, किटकनाशके, रोपवाटिका, बचतगट, सुक्ष्मसिंचन आदी विभागाचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. याशिवाय सायंकाळच्या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होत असून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
भरडधान्यास प्रोत्साहन...
जिल्ह्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. म्हणजेच ज्वारी, बाजरी अशा भरडधान्यास देशासह जगाने स्वीकारले आहे. जागतिक स्तरावर यंदा भडरधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.
याचसाठी ज्वारी, बाजरी, नाचणीपासून बनविलेले बिस्किटे, बिर्याणी, थालीपीठ, लाडू आदी पदार्थ उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.