Nashik News: पाऊस थांबायचा नावं घेईना. तीन एकर मका खराब होऊन काळवंडली आहे. काही ठिकाणी कोंब निघत असल्याने हातातून सगळं गेलं. केलेला खर्च निघणार नाही. पंचवीस हजार रुपयांचे कांदा बियाणे पेरले. मात्र अतिवृष्टीने पूर्ण नुकसान आहे. त्यामुळे भविष्य अवघड आहे. .दिवाळीचा सण आला आणि गेला. कुठेही रोषणाई नाही. हातात पैसाच नसल्याने आता रब्बी हंगामाला सामोरे कसे जायचे हा प्रश्न आहे. या अतिवृष्टीने दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले, अशी वेदनादायी भावना हनुमाननगर विंचूर (ता. निफाड) येथील सचिन कडलग हे तरुण शेतकरी मांडत होते..सप्टेंबरअखेर झालेल्या अतिवृष्टीनंतर आता दुसऱ्यांदा तडाखा दिल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. दिवाळीसारख्या सणाला अस्मानी संकटांने शेतकऱ्याला चहूबाजूने घेरले आहे. मका, सोयाबीन, लेट खरीप व रब्बी कांदा रोपवाटिका यासह भाजीपाला पिके पाण्याखाली आहेत..Rain Crop Damage: मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा झोडपले.तर हंगामाच्या तोंडीच द्राक्ष बागांना मोठा फटका बसल्याने दुर्दशा झाली आहे. निफाड तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याने अनेक शिवारांमधून पाणी वाहत आहे. शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यावर अनेक ठिकाणी मक्याची कणसे, सोयाबीन व चारा तरंगत असल्याचे वेदनादायी चित्र आहे. दिवाळीसारख्या सणाला गोड घास कडू झाला..एकीकडे दिवाळीला मजूरटंचाई त्यात अधिकची मजुरी देऊन शेतकऱ्यांनी कापणी केली. मात्र अतिवृष्टीच्या तडाख्यात हातातोंडाशी आलेले मका आणि सोयाबीन पीक पावसामुळे शेतातच भिजले आहे. शेतात पाणी साचल्याने सोयाबीनच्या शेंगा काळवंडल्या आणि तर उरलासुरला मका पूर्णपणे भिजून गेला..त्यात पावसाची संततधार सुरू असल्याने सोयाबीन तर गेलीच पण मका सडून आता कोंब फुटू लागले आहे. जनावरांचा चारा भिजून खराब झाल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे..कांदा रोपवाटिकांचे अतोनात नुकसानरब्बी उन्हाळ कांद्याच्या रोपवाटिकांमध्ये मोठे नुकसान आहे. कोट्यवधी रुपयांचे बियाणे शेतकऱ्यांनी मातीआड केले. मात्र अतिवृष्टीच्या तडाख्यात होत्याचे नव्हते झाले आहे. पुढील कांदा लागवडी पूर्ण करण्यासाठी दुबार रोपवाटिका तयार कराव्या लागतील. मात्र अगोदरच पदरमोड करून महागडे बियाणे घेतले. आता भांडवल नाही आणि बियाणे देखील कुठून आणायचे हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर आहे..Crop Damage: हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याच्या मार्गावर.द्राक्ष हंगामाच्या तोंडीच अस्मानीचा घावसप्टेंबरपासून अतिवृष्टीच्या फटक्यामुळे द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान आहे. छाटणीपश्चात घड निघण्यात अडचणी, घड जिरण्यासह ते बाळीवर जाण्याची समस्या तर आगाप फुलोरा अवस्थेतील बागांमध्ये घडकूज व सड होण्याची प्रमुख समस्या आहे. पुढे हातात माल काही येईल की नाही अशी भीषण परिस्थिती आहे. .आताही बागेत पाणी वाहत आहे. द्राक्ष वाचवण्यासाठी फवारणी करणे आवश्यक, मात्र बागेतील शेतात चिखलामुळे ट्रॅक्टर चालत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे बागा सांभाळायच्या कशा? त्यासाठी भांडवल आणायचे कुठून? मागचेच कर्ज फिटलेले नाही, अशी भावना नैताळे (ता. निफाड) द्राक्ष उत्पादक भारत तासकर यांनी मांडली..आगामी हंगामाचे चित्र अस्पष्टपाऊस आज थांबेल, उद्या थांबेल या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. दिवाळीच्या दरम्यान मजूरटंचाई आणि मका, सोयाबीन सोंगण्या आल्या. त्यात अतिवृष्टीचे संकट डोक्यावर आले. निफाड तालुक्यात ४६२ मिमी सरासरी पाऊस असताना तो काही ठिकाणी जवळपास १,००० मिमी पर्यंत झाल्याने परिस्थिती अवघड आहे. .एकरी उत्पादकता व दर चांगले असल्याने गेल्या तीन-चार वर्षात मका पीक परवडणारे होते. हे पीक यंदा पाण्यात आहे. सोयाबीनचे देखील मोठे नुकसान आहे. सध्या पावसामुळे भूजल पातळी वाढलेली स्थिती आहे; मात्र पुढे पिके कोणती करावी आणि रब्बी हंगाम पुढे कधी उभे राहील हे काही सांगता येत नाही अशी भीषण परिस्थिती आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कृषी अभ्यासक नानासाहेब पाटील यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.