Heavy Rainfall : गडहिंग्लजमध्ये पूर, अतिवृष्टीमुळे अडीच हजारवर शेतकरी बाधित

Kharif Crop Damage : २७९० शेतकरी बाधित झाले असून, उसासह विविध खरीप पिकांना पावणेदोन कोटींचा फटका बसला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : तालुक्यातील हिरण्यकेशी आणि घटप्रभा नद्यांना आलेल्या पुरामुळे आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा पूर्ण झाला आहे. त्यातून २७९० शेतकरी बाधित झाले असून, उसासह विविध खरीप पिकांना पावणेदोन कोटींचा फटका बसला आहे.

जुलैमधील मुसळधार पावसामुळे हिरण्यकेशी, घटप्रभा नद्यांसह ओढ्यांनाही पूर आला. नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील पिके दहा ते बारा दिवस पाण्याखाली राहिली. ओढ्यांच्या प्रवाहात काठावरील शेतीतील जमिनीची धूप आणि कोवळी पिकेही वाहून गेली. चांगली उगवण झालेली पिके पावसामुळे नष्ट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.

Crop Damage
Crop Damage : काढणीला आलेल्या मुगाचे पावसाने नुकसान

या पिकांसह अतिवृष्टी झालेल्या केवळ नेसरी मंडलमध्ये सरसकट पिकांचा पंचनामा केला आहे. नदीकाठावरील शेतीत गुडघाभर चिखल असूनही कर्मचाऱ्यांनी तशा परिस्थितीतच गतीने पंचनामे पूर्ण केले आहेत. तहसीलदार ऋषिकेत शेळके, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे, गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या मार्गदर्शनाने तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक या त्रिसदस्यीय पथकाने हे पंचनामे केले.

Crop Damage
Heavy Rain : वादळी वारे, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

नदीकाठावर विशेष करून भात व ऊस पीक घेतले जाते. या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला आदी पिकांना पूर व अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

३७२ हेक्टर खरीप जिरायत पिकांचे ५२ लाख २३ हजार, तर ४३४ हेक्टरमधील बागायत पिकांचे १ कोटी २० लाखांचे नुकसान झाले आहे. नेसरी मंडलमध्ये सरसकट पंचनामे केल्याने नुकसानीचे आकडे वाढले आहेत. ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामे केले आहेत. आता नुकसान भरपाईसाठी निधीची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com