Fibers : तंतूमय घटक आरोग्यासाठी महत्त्वाचे...

Fibers Update : संतुलित आहारात तंतूमय घटकांचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. सध्या अगदी शहरापासून ते गावातील लोकांच्या जेवणाच्या ताटात तंतुविरहित किंवा कमीत कमी तंतूमय घटक असलेले अन्नपदार्थ दिसून येतात.
Fibers
FibersAgrowon

डॉ.अर्चना ठोंबरे

Fibers : संतुलित आहारात तंतूमय घटकांचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. सध्या अगदी शहरापासून ते गावातील लोकांच्या जेवणाच्या ताटात तंतुविरहित किंवा कमीत कमी तंतूमय घटक असलेले अन्नपदार्थ दिसून येतात.

अगदी साधे उदाहरण म्हणजे पिठाच्या डब्यात असणारी चाळणी ! पोळी किंवा भाकरीचे पीठ भिजविण्याच्या अगोदर पीठ चाळून घेतले जाते. म्हणजेच पिठात असलेले तंतूमय घटक बाहेर काढले जातात.

आहारातील तंतूमय घटक हे धान्य,डाळी,भाजीपाला, फळांच्या माध्यमातून मिळत असतात. हे वनस्पतीचा खाण्यायोग्य भाग असून आपल्या छोट्या आतड्यामध्ये शोषण आणि पचन होत नाही.तंतू हे पाण्यात विरघळणारे आणि पाण्यात न विरघळणारे असे दोन प्रकारचे असतात.

पाण्यात विरघल्यावर जेल तयार होते आणि ते रक्तातील घातक मेद , साखर कमी करतात. पाण्यात न विरघळणारे तंतू हे आतड्यातील हालचाल वाढवतात.

Fibers
Water Processing : अन्नपदार्थांतील पाणी क्रियाकलापास प्रभावित करणारे घटक

तृणधान्यातील तंतू हे बद्धकोष्ठता,तसेच छोट्या व मोठ्या आतड्यांचे आजार होण्याचा धोका कमी करतात. उदा.कर्करोग. याचबरोबर स्त्रियांमध्ये दिसून येणारे मूळव्याध, भगंदर आजार झालेला असल्यास तंतूमय घटकांच्यामुळे त्रास कमी होतो.

याचबरोबर तंतुमय घटकांच्यामध्ये असलेली पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि छोट्या आतडयातून संथ गतीने जाण्याचा गुणधर्म असल्यामुळे पित्ताशयातील खडे तयार होण्याचा धोका कमी होतो. आतड्यामधील असणारे उपयुक्त जिवाणू तंतूमय घटकांच्यामुळे वाढीस लागतात. त्यामुळे निरोगी पचनसंस्थेसाठी आहारात तंतूमय घटकांचा समावेश महत्त्वाचा असतो.

लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह हे आजार सगळीकडे आणि सर्व वयोगटात दिसत आहेत. तंतूमय पदार्थ हे शरीरात तयार होणारे विघातक घटक उदा. वाईट मेद,वाढलेली साखर, चरबीला चिकटतात.

त्यामुळे उचरक्तदाब, हृदयविकार, मेंदूमध्ये रक्तस्राव, मधुमेह, स्थूलता यास प्रतिबंधित होते त्याचबरोबर हे आजार आटोक्यात आणण्यास मदत होते. वजन नियंत्रित राहाते. प्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी आहारात तंतूमय पदार्थ असणे महत्त्वाचे आहे.

Fibers
Vineyard Management : द्राक्षातील आरोग्यदायी फेनॉलिक घटक : रेझवेराट्रोल

तंतूमय घटक असणारे धान्य ---- प्रमाण प्रति १०० ग्रॅम

छोटा साव ---१२.५ ग्रॅम

भगर --- १०.१ ग्रॅम

सावा /कुटकी --- ७.६ ग्रॅम

कोदो --- ९ ग्रॅम

राळ---८ ग्रॅम

नाचणी---३.६ ग्रॅम

बाजरी--- १.३ ग्रॅम

ज्वारी --- ४ ग्रॅम

(लेखिका आहार तज्ज्ञ आहेत)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com