Marathwada Assembly Election : मराठवाड्याच्या तीन जिल्ह्यांतील ४३१ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद

Maharashtra Election 2024 : या मतदानामुळे तीनही जिल्ह्यातील सुमारे ४३१ उमेदवारांची भाग्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होण्याची प्रक्रिया सुरू होती.
Maharashtra Election 2024
Maharashtra Election 2024 Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यात मतदान केद्रांवर काही ठिकाणी ईव्हीएम मशिन काही वेळासाठी बंद पडण्यासह एक-दोन ठिकाणी झालेल्या घटनांचा अपवाद वगळता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांतील २० विधानसभा मतदार संघांत बुधवारी (ता. २०) सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरळीत सुरू होते.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६०.८३ टक्के, जालनामध्ये ६४.१७ टक्के, तर बीड जिल्ह्यात सरासरी सुमारे ६०.६२ टक्के मतदान झाले होते. या मतदानामुळे तीनही जिल्ह्यातील सुमारे ४३१ उमेदवारांची भाग्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होण्याची प्रक्रिया सुरू होती.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार तोफा निश्‍चित वेळेत थंडावल्यानंतर बुधवारी (ता. २०) सकाळी सात वाजल्यापासून तीनही जिल्ह्यातील ७४४४ मतदान केंद्रावरून प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुपारपर्यंत तिन्ही जिल्ह्यांत तीन-चार ठिकाणी ईव्हीएम मशिन बंद पडण्याचे प्रकार घडले, नंतर मतदान सुरळीत झाले. बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघांतर्गत येत असलेल्या घाटनांदूर येथे मतदान केंद्राध्यक्षांना मारहाण व मतदान यंत्राच्या तोडफोडीचा प्रकार घडला.

या व अशा काही घटनांचा अपवाद वगळता सगळीकडे शांततेत मतदान सुरू होते. पहिला टप्प्यांत झालेल्या मतदानाच्या तुलनेत दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात मतदानाची गती चांगलीच वाढली. दुपारी तीन वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात ३२७३ मतदान केंद्रावर सुमारे ४७.०५ टक्के मतदान झाले.

त्यामध्ये सिल्लोड मतदारसंघात ५७.६३ टक्के, कन्नडमध्ये ४८.६० टक्के, फुलंब्रीमध्ये ४९.२९ टक्के, औरंगाबादमध्ये ४१.३१ टक्के, औरंगाबाद पश्‍चिममध्ये ४०.१० टक्के, औरंगाबाद पूर्व मध्ये ४४.९४ टक्के, पैठणमध्ये ५३.३० टक्के, गंगापूरमध्ये ४३.२० टक्के, वैजापूरमध्ये ४६.८३ टक्के, झालेल्या मतदानाचा समावेश होता.

Maharashtra Election 2024
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के, झारखंडमध्ये १२.७१ टक्के मतदान

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत २४१६ मतदान केंद्रावरून सुमारे ४६.१५ टक्के मतदान झाले. त्यामध्ये गेवराई मतदार संघात ५०.७६ टक्के, माजलगाव मध्ये ४६.४२ टक्के, बीडमध्ये ३८.२३ टक्के, आष्टीमध्ये ४२.८१ टक्के, केजमध्ये ४७.१३ टक्के, तर परळीत ५२.४१ टक्के झालेल्या मतदानाचा समावेश होता. जालना जिल्ह्यातील पाच मतदारसंघात १७५५ मतदार केंद्रावरून सुमारे ५०.१४ टक्के मतदान झाले होते.

त्यामध्ये परतूर मतदारसंघात ४७.५७ टक्के, घनसावंगी ५१.९९ टक्के, जालन्यात ४६.७४ टक्के, बदनापूरमध्ये ५१.२९ टक्के, तर भोकरदन मध्ये झालेल्या ५३.२९ टक्के मतदानाचा समावेश होता. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे ६०.८३ टक्के, बीड जिल्ह्यात सुमारे ६०.६२ टक्के, तर जालना जिल्ह्यात सुमारे ६४.१७ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरही मतदानाची प्रक्रिया सुरूच होती.

घाटनांदूरच्या केंद्रावर तोडफोड

परळी विधानसभेसाठी बुधवारी सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दुपारी बाराच्या सुमारास घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथे सोमेश्‍वर विद्यालय व जिल्हा परिषद शाळेच्या बूथवरील केंद्राध्यक्ष श्री. मुंडे यांना काही युवकांनी मारहाण करत चार मशिनची तोडफोड केली.

केंद्राध्यक्ष श्री. मुंडे यांना तत्काळ आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घाटनांदूर येथील सोमेश्‍वर विद्यालयातील बूथ क्रमांक २८०, २८१, २८३ व जिल्हा परिषद शाळेतील बूथ क्रमांक २८२ या केंद्रावरील चार मशिनची तोडफोड करत केंद्राध्यक्ष श्री. मुंडे यांना काही युवकांनी मारहाण केली.

Maharashtra Election 2024
Maharashtra Assembly Election 2024 : पुणे जिल्ह्यात उत्साही वातावरणात मतदान

मुंडे यांना तत्काळ आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या वेळी पोलिस उपाधिक्षक श्री. चोरमले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मतदान यंत्राला इजा पोहोचविण्याचा प्रयत्न केला असला, तरी आधी मतदान केलेल्यांचे मतदान सुरक्षित आहे. घाटनांदूर येथील मतदानाची प्रक्रिया पुन्हा ईव्हीएम मशिन पुरवून सुरळीत करण्यात आली आहे. शिवाय अशा प्रकारे मतदान केंद्रावर घटना करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची पावले उचलली जात असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी दिली.

अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

बीड मतदार संघामध्ये विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अपक्ष अर्ज दाखल केलेल्या एका अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. दरम्यान, निवडणूक लढविण्यासाठी एकूण ३१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी एका अपक्ष उमेदवाराचा मतदान प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले उमेदवार बाळासाहेब शिंदे (वय ४५) यांचे विधानसभा मतदान प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com