Early Monsoon Impact : केज तालुक्यातील ७४ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

Kharif Sowing : केज तालुक्यातील एक लाख १४ हजार ८४६ हेक्टर भौगोलिक क्षेत्रफळापैकी एक लाख पाच हजार ११२ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे.
Crop In Crisis
Crop In CrisisAgrowon
Published on
Updated on

Beed News : केज तालुक्यातील एक लाख १४ हजार ८४६ हेक्टर भौगोलिक क्षेत्रफळापैकी एक लाख पाच हजार ११२ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. मागील दोन वर्षांत मृग नक्षत्रात खरिपाच्या पेरण्या उरकल्या होत्या.

मात्र, यावर्षी मे महिन्यातच जोरदार पाऊस झाल्याने मृग नक्षत्रातच उपलब्ध ओलीवर ७४ हजार ६१२ हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामाची पेरणी झाली असून, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने उर्वरित ३० हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर अद्यापही पेरणी झालेली नाही.

तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्प हा सिंचनासाठी वरदान ठरलेला आहे. त्यामुळे या ग्रीनबेल्ट म्हणून ओळख असलेल्या या परिसरात मे महिन्यात बिगर मोसमी पाऊस झाल्याने उसाच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाली आहे. तालुक्यात अंदाजे ९६ हजार ४५९ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे.

Crop In Crisis
Kharif Sowing : अमरावती जिल्ह्यात खरीप पेरा ८२ टक्के क्षेत्रावर

यावर्षी मान्सूनच्या पावसाचे मृग नक्षत्राच्या सुरवातीलाच आगमन झाल्याने संपूर्ण खरिपाची पेरणी उरकली होती. यावर्षी कधी नव्हे तो मे महिन्यातच तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील जलस्रोतांत बऱ्यापैकी साठा झाला.

Crop In Crisis
Kharif Sowing : मराठवाड्यात तुरीची ३ लाख ४३ हजार हेक्टर पेरणी

त्यामुळे मे महिन्यात झालेल्या पावसाच्या ओलीवरच २४ जूनच्या तालुका कृषी विभागाच्या साप्ताहिक पेरणी अहवालानुसार, काही शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी उरकली. मृग नक्षत्रात पेरणी झाल्याने सर्वच पिके जोमाने उगवली. मात्र मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने जोमात आलेली पिके माना टाकू लागली आहेत. अद्यापही काही भागांत पेरणीच झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

मंडळनिहाय २४ जूनचा पेरणी अहवाल

केज (६३.२६.८७ टक्के), होळ (५७.०९ टक्के), युसूफ वडगाव (६८.३० टक्के), बनसारोळा (७१.२८ टक्के), विडा (७७.५६ टक्के), नांदुरघाट (८०.३५ टक्के), हनुमंतपिंपरी (८०.७४ टक्के), चिंचोलीमाळी (६४.३२ टक्के) व मस्साजोग (७७.५० टक्के) एकूण ७०.९८ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली. मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पुढील काही दिवसांत पाऊस पडताच उर्वरित क्षेत्रावर आर्द्रा नक्षत्रात पेरणी होऊन तालुक्याच्या खरीप हंगामाच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com