Maharashtra Election 2024 : आचारसंहिता कालावधीत २९ कोटींचा मुद्देमाल जप्त

Code Of Conduct : विविध तपासणी व जप्ती कारवाईत आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत २९ कोटी १४ लक्ष २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी सुरू आहे. विविध तपासणी व जप्ती कारवाईत आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत २९ कोटी १४ लक्ष २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तब्बल ३ लाख १७ हजार ९३९ वाहनांची तपासणी केली आहे, अशी माहिती आचारसंहिता कक्षातून देण्यात आली.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत स्थिर सर्व्हेक्षण पथकांमार्फत करण्यात आलेल्या वाहन तपासणीचा तपशिल याप्रमाणे - राजकीय पक्षांची वाहने ३८४, खासगी वाहने १७ हजार ५, सार्वजनिक वाहने ४९३, शासकीय वाहने १७५, पोलिस यंत्रणेची वाहने ९२, रुग्ण्वाहिका व अत्यावश्यक सेवेची वाहने ८३, वैद्यकीय विभागाची वाहने ४४, बॅंकांची वाहने २४ अशी एकूण १८ हजार ३०० वाहने तपासण्यात आली आहेत.

Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Election 2024 : सिंचनासाठी पाणी, वीज, शेतरस्त्यांच्या समस्या वर्षानुवर्षे कायम

तर आचारसंहिता सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३ लाख १७ हजार ९३९ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. त्याच बरोबर भरारी पथकांनीही १७८५ वाहनांची तपासणी केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Election 2024 : सरकारने देशातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट करून ठेवली

तसेच २८२ ठिकाणी अचानक भेटी दिल्या आहेत. जप्तीच्या कारवाईत जिल्ह्यात आतापर्यंत ६ कोटी २३ लाख ८१ हजार रुपयांची रोकड जप्ती झाली आहे.

तसेच ५५ हजार २११.६२ लिटर दारू (किंमत १ कोटी ४६ लाख १४ हजार रुपये), १ कोटी ४ लाख ५३ हजार रुपयांचे अमली पदार्थ, १८ कोटी ४२ लाख ३६ हजार रुपयांचे मौल्यवान धातू, १ कोटी ९६ लाख ५३ हजार रुपयांचे भेट वस्तू असा एकूण २९ कोटी १४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com