Indian Agriculture : मनाची मशागत अत्यंत गरजेची |Agrowon Story

सध्याच्या कलियुगात विज्ञानाने खूपच प्रगती केलेली आहे. परंतु याला अध्यात्माची जोड असणे गरजेचे आहे. कारण विज्ञान हे अध्यात्माशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

जगन्नाथ बाविस्कर

सध्याच्या कलियुगात विज्ञानाने खूपच प्रगती केलेली आहे. परंतु याला अध्यात्माची जोड असणे गरजेचे आहे. कारण विज्ञान हे अध्यात्माशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. अध्यात्म आणि विज्ञानामुळेच माणूस विकसित झाला पण अति विज्ञानामुळे त्याच मानवाची अधोगतीही होत आहे. कारण आजकाल माणूसच माणसाला संपवत आहे.

मानवनिर्मित विज्ञानातूनच यंत्रमानवाची निर्मिती होत आहे. भूतकाळातील आदिमानवाच्या जागेवर वर्तमानाच्या विज्ञानामुळे भविष्यातील यंत्रमानवांची वस्ती सृष्टीवर राहील की काय, अशीही शंका आहे. मग ती जिवंत की मृत हा सुद्धा विचार करायला लावणारा प्रश्‍न आहे. कारण जीवसृष्टीचा ऱ्हास व्हायला सुरुवात झालेलीच आहे.

निसर्गातील प्राणिमात्र सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर राहतील. म्हणून मुक्या प्राण्यांवर भूतदया करण्याची गरज आहे. वर्षानुवर्षांपासूनच्या अपूर्ण गोष्टी या पन्नास वर्षात दिसून येत आहेत. भारत विकसित होणे गरजेचे आहे, परंतु आजही आपला देश विकसनशीलच आहे.

महासत्ता बनू पाहणारा भारत देश जगात महान आहे. आदर्श लोकशाही असणारा आपला भारतदेश देव, धर्म, अध्यात्म, शास्त्र, समाज, कुटुंब, व्यक्ती यांच्या आधारावरच अवलंबून आहे.

Indian Agriculture
Indian Agriculture : जामनेरच्या आशाबाई पाटील यांनी कुटुंबाला सावरून शेतीला दिली दिशा

भारताची राज्यघटना अति उच्चतम कोटीची आहे. तळागाळातील व्यक्तीला विचार स्वातंत्र्य हा घटनेचा गाभा आहे. लोकशाही व राज्यघटना हे दोन्ही घटक सुद्धा देशाच्या उन्नतीसाठी उपयुक्त आहेत. आपल्या कृषिप्रधान देशात शेती व मातीच्या मशागतीस खूप महत्त्व आहे. जगाचा पोशिंदा म्हणवणारे शेतकरी व कामकरी हेच आपले उदरपोषण करू शकतात.

शेतीच्या मालाला हमीभाव मिळाला तर शेतकरी टिकेल आणि कष्टकऱ्यांमुळे कार्य कुशल होईल. पर्यायाने आपला देश विकसित होईल. यासाठी शेतीमाती सोबतच मनाची सुद्धा मशागत झाली पाहिजे. मन, बुद्धी, चातुर्य माणसाला कार्यरत ठेवतात.

कार्य सफलतेमुळे मानवाचे समाधान होते. आणि समाधानाचे बीज मनात रुजवले की प्रगती आपोआपच होते. यासाठी षड्रिपूंपासून दूर जाणे गरजेचे आहे. कारण यामुळेच मानवाची अधोगती होत आहे. भाजी-भाकरी पेक्षा फास्टफूडचा जमाना सुरू झालेला आहे. पोषक अन्न घटक संपुष्टात येऊन रासायनिक विष घटक पोटात जात आहेत.

व्यक्तिपरत्वे आजारांची संख्याही वाढत असून व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती व प्रकृती असे चित्र बघावयास मिळत आहे. आपली जीवनमूल्ये न जपता प्रत्येकाने त्यांचा ऱ्हास करायला सुरुवात केलेली आहे. आहारावर विहार अवलंबून असतो.

परंतु सध्या तरी अशुद्ध आहारामुळेच सर्वांना दवाखान्यातच विहार करावा लागत आहे. यासाठी ‘विषमुक्त शेती व रोगमुक्त भारत’ बनविण्यासाठी ‘शेतीमाती सोबत मनाची मशागत’ करणे गरजेचे झाले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com