Yavatmal News: पावसाची संततधार, अतिवृष्टीचा फटका बसत यंदा कपाशीची उत्पादकता घटली असतानाच आता फुटलेल्या कापसाच्या वेचणीसाठी वाढीव मजुरीसाठी मजूर अडून बसले आहेत. वणी तालुक्यात यंदा पहिल्या वेच्यासाठीच ११ रुपये प्रति किलोप्रमाणे वेचणीसाठी मजुरी आकारली जात आहे. यातूनच उत्पादकता खर्चात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. .यवतमाळ जिल्ह्यात खरीप पिकांची पेरणी सुमारे ९ लाख हेक्टरवर होते. यात सर्वाधिक पावणेपाच ते पाच लाख हेक्टर क्षत्र हे एकट्या कापसाखाली राहते. परंतु यंदा जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाची संततधार होती. त्याबरोबरच काही मंडलांमध्ये अतिवृष्टी तर काही भागात ढगफुटीसदृश पाऊस बरसला..Cotton Damage : सप्टेंबरमध्ये तीन जिल्ह्यांत कपाशीचे ६ लाख ४६ हजार हेक्टरवर नुकसान.त्याच्या परिणामी नद्या, नाल्यांना पूर आला तर काही ठिकाणी कापसाची फूल आणि बोंडधारणाच झाली नाही. याचा थेट परिणाम उत्पादकतेवर झाला आहे. उत्पादकता आणि कापसाची प्रतही अपेक्षित नसताना बाजारात दरही कमी आहेत. ८८१० रुपये प्रति क्विंटल असा दर कापसाला असताना बाजारात मात्र ७००० ते ७२०० रुपयांनी कापसाचे व्यवहार होत आहेत. त्यामुळे कापूस उत्पादकांमध्ये मोठी अस्वस्थता आहे..सध्या वणी तालुक्यातील काही शिवारांत कापूस वेचणीसाठी आला आहे. परंतु कापसाची एकाचवेळी फूट झाल्याने वेचणीकामी मजुरांची उपलब्धता करणे शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे ठरत आहे. त्यामुळेच वेचणी मजुरीत वाढ करण्यात आली आहे. सध्या कापूस वेचणीकामी प्रति किलो ११ रुपये असा दर वणी तालुक्यात आकारला जात आहे..Cotton Market: खानदेशात कापसाची आवक अल्प.प्रति किलो मजुरी द्यायची नसल्यास दिवसातील काही ठरावीक तासांसाठी ३०० रुपये मजुरी दर घेतला जात आहे. दिवसभरात एका मजूराच्या माध्यमातून सरासरी २० किलो कापसाची वेचणी होते. त्याचा विचार करता कापूस वेचणीचा दर १५ रुपये किलोपेक्षा अधिक होतो. परिणामी, शेतकऱ्यांना दिवसाची मजुरी चुकविणेदेखील खर्चिक ठरत आहे..कापूस वेचणी होणार तोच पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कापसाची प्रत आणखी खालावली आहे. आता झाडांवरच कापूस लोंबला आहे. अशा कापसाला प्रत नसल्याने अपेक्षित दर मिळणार नाही. त्यातच मजुरी खर्चातही वाढ झाल्याचे चित्र आहे. पणन महासंघाचा हमीभाव खरेदीसाठी केंद्र सरकारच्या सीसीआयबरोबर करार झाला आहे. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे अद्याप प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होऊ शकली नाही.संजय खाडे, संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.