Ethics Committee: आमदारांच्या नीतिमूल्यांसाठी समिती

Assembly Speaker Rahul Narvekar: संसदेच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचीही नीतिमूल्य समिती स्थापन करून आमदारांच्या गैरवर्तनाबाबत निलंबन आणि बडतर्फीचे अधिकार देण्यात येतील, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी (ता. १८) केली.
Assembly Monsoon Session 2025
Assembly Monsoon Session 2025Agrowon
Published on
Updated on

Mumbai News: संसदेच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचीही नीतिमूल्य समिती स्थापन करून आमदारांच्या गैरवर्तनाबाबत निलंबन आणि बडतर्फीचे अधिकार देण्यात येतील, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी (ता. १८) केली.

विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील लॉबीत गुरुवारी सायंकाळी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीच्या घटनेनंतर अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहात या बाबतची घोषणा केली. तसेच हाणामारी करणारे पडळकर यांचे मावसभाऊ सर्जेराव टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करून तो विशेषाधिकार समितीकडे पाठविण्यात आला.

Assembly Monsoon Session 2025
Maharashtra Assembly: आमदारांच्या कार्यकर्त्यांना विधिमंडळ परिसरात बंदी; अध्यक्षांचा निर्णय

यापुढे आमदारांचे स्वीय सहायक आणि शासकीय अधिकाऱ्यांनाच प्रवेश पास देण्यात येतील. अन्य व्यक्तींना विधिमंडळात प्रवेश देण्यात येणार नसल्याचेही जाहीर केले.गेल्या दोन दिवसांपासून आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांच्यात वाद सुरू होता. याचे पर्यावसान गुरुवारी कार्यकर्त्यांच्या हाणामारीत झाले.

मुख्य लॉबीत पडळकर यांचा मावसभाऊ असल्याचे सांगणारा सर्जेराव टकले याने आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याच्यात हाणामारी झाली. या घटनेचा अहवाल अध्यक्ष नार्वेकर यांनी मागविला होता. दुपारी या बाबत नार्वेकर यांनी सभागृहात माहिती दिली.

Assembly Monsoon Session 2025
Maharashtra Assembly Session: ‘राइट टू रिप्लाय’वरून विधानसभेत जोरदार गोंधळ

श्री. नार्वेकर म्हणाले, की विधिमंडळाच्या लॉबीमध्ये दोन अभ्यांगतांमध्ये मारामारी झाली आहे. या दोघांना ताब्यात घेतले असून विधिमंडळाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी अहवाल दिला आहे. नितीन देशमुख हे आमदार आव्हाड यांच्यासोबत आल्याचे सांगण्यात आले. तर सर्जेराव टकले हा आमदार पडळकर यांचा मावसभाऊ असल्याचे सांगत असून तो त्यांच्यासोबत विधिमंडळ आवारात आला. या घटनेनंतर विधीमंडळाच्या सदस्यांबाबत टीकाटिपण्णी केली जात असल्याने ही गंभीर बाब आहे. या प्रकरणामुळे विधिमंडळाच्या प्रतिमेला तडा गेला आहे.

पडळकरांची दिलगिरी

आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करत सूचनांचे पालन करू, असे सांगितले.

घटनेशी माझा संबंध नाही : आव्हाड

नितीन देशमुख हे माझ्यासोबत आले नव्हते किंवा मी त्यांना आणले नव्हते, असे सांगत ही घटना घडली तेव्हा आपण सभागृहात किंवा आवारातही नसल्याचे आमदार आव्हाड यांनी सांगितले. या घटनेशी माझा काहीच संबंध नाही. त्यामुळे रेकॉर्डवर चुकीचे येऊ नये. मी कुणाला खुणावले नाही. लोकशाहीच्या मंदिरात ही घटना घडली. मला अजूनही गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली जाते, अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेचे वाईट वाटते असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com