Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला ३५५० रुपये दर जाहीर करावा आणि हा दर एकरकमी द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. दर जाहीर केला नाही तर अहिल्यानगरला १७ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी व प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात शेतकरी मुक्काम आंदोलन करणार, असल्याचा इशारा शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला आहे..अहिल्यानगर येथे शुक्रवारी (ता. ३१) जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, साखर कारखान्याचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने आयोजित केली होती. मात्र या बैठकीत सर्व विषयावर चर्चा झाली, पण ऊस दराबाबत तोडगा निघाला नाही..Sugarcane Price: सांगलीत कारखानदारांंचे ऊसदराबाबत मौन.त्यामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शेतकरी संघटना आक्रमक होणार असल्याचे स्थिती आहे. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष रावसाहेब लवांडे, शिवसेना (शिंदे गट) नेते अभिजित पोटे, बाळासाहेब फटांगडे, रमेश कचरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, युवराज जगताप यांच्यासह जिल्हाभरातील शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अभिजित पोटे यांनी जिल्हाधिकारी, प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना निवेदन दिले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार उसाला प्रती टन ३५५० रुपये दर देणे गरजेचे आहे..साखर कारखान्याकडून होणारी ऊसाची काटामारी थांबवावी, साखर उतारा काढण्यासाठी शासनाने स्वतंत्र सरकारी यंत्रणा उभी करावी, कारखाने अन्य कार्यक्षेत्रातून दूरवरून ऊस आणतात. त्यात वाहतूक भाडे मोठ्या प्रमाणात लावतात. मात्र दर सगळीकडे सारखाच असतो. त्यामुळे अधिकचे वाहतूक भाडे शेतकऱ्यांकडून वसुल केले जाते..Sugarcane Rate Protest: कोल्हापूर जिल्ह्यात कारखाना समर्थक- ऊस आंदोलकांमध्ये संघर्ष.कारखान्याजवळचा ऊस लवकर तोडला नाही तर वजन कमी होते. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. ऊस तोडणीनंतर १४ दिवसात पैसे देणे बंधनकारक आहे. अशा अनेक बाबीवर चर्चा झाली, पण बैठकीत काहीही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आमच्या मागण्यांवर निर्णय व्हावा अन्यथा सर्व शेतकरी संघटना अहिल्यानगरला १७ नोव्हेंबर ला जिल्हाधिकारी व प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात शेतकरी मुक्काम आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले..कर्ज वसुली करू देणार नाही : अनिल औताडेशेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले, आम्ही बैठकीत अनेक मुद्दे मांडले आहेत. सरकार कर्जमाफी करणार असल्याचे सांगतोय. शिवाय शेतकरी यंदा पुर, अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आहेत. बॅंका मात्र कारखान्यांना हाताशी धरुन शेतकऱ्यांच्या कर्जाची उसाच्या बिलातून वसुली करतात. यंदा मात्र ऊसबिलातून कर्जवसुली करण्याला आमचा तीव्र विरोध असेल. जर वसुली करण्याचा प्रयत्न केला तर शेतकऱ्याचे मोठे आंदोलन उभारणार आहोत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.