Rakshabandhan : ‘ॲग्रोवन’ माझा भाऊराया!

Agrowon Newspaper : शेतीमध्ये प्रगती करताना अडीअडचणीत साथ देणाऱ्या आणि गरजेच्या वेळी मार्गदर्शन करण्यासाठी पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या ‘अॅग्रोवन’लाच मी भाऊ मानले आहे.
Agrowon Newspaper
Agrowon NewspaperAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘आम्ही पाच बहिणी...आम्हाला भाऊ नाही. मात्र भावाची उणीव कधीच भासत नाही. शेतीमध्ये प्रगती करताना अडीअडचणीत साथ देणाऱ्या आणि गरजेच्या वेळी मार्गदर्शन करण्यासाठी पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या ‘अॅग्रोवन’लाच मी भाऊ मानले आहे. शेतीची आवड ‘अॅग्रोवन’मुळे लागली. यातून मिळालेल्या ज्ञानरूपी मार्गदर्शनाच्या शिदोरीमुळे प्रगतीचा आलेख सतत चढता राहिला आहे,’’ कचरवाडी (ता. इंदापूर) येथील शुभांगी माणिक बरळ यांनी ‘अॅग्रोवन’च्या साथीने अनोखे रक्षाबंधन करून आपली कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने दररोज घरी येणाऱ्या दैनिक अंकाबरोबरच, दिवाळी अंक, अॅग्रोगाइड आणि ‘अॅग्रोवन’ची सर्वच प्रकाशने मला वाचायला मिळतात. ही बरीचशी प्रकाशने माझ्या संग्रही जपून ठेवली आहेत. ज्या वेळी काही मदत लागते तेव्हा त्यातून मोलाचे मार्गदर्शन मिळते. ‘अॅग्रोवन’ हा जीवनाचा अविभाज्य भाग असून, त्या शिवाय आमचा दिवस सुरू होत नाही. शेतजमीन नसताना, साध्या झोपडीतून आम्ही बंगल्यात राहायला आलो. यात ‘अॅग्रोवन’चा वाटा फार मोठा आहे. या ऋणामुळेच आम्ही आमचा बंगला, गाडी, शेततळे येवढेच काय तर नुकत्याच सुरू केलेल्या नर्सरीला देखील ‘अॅग्रोवन’चे नाव दिले आहे.

Agrowon Newspaper
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचा रद्दचा आदेश घेऊन कोल्हापुरात या अन्यथा, महिलांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

शेतमजूर ते शेतीमालक असा प्रवास ‘अॅग्रोवन’ साथीने झाला असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, ‘‘स्वतःची शेती सुरू केली तेव्हा पहिले बागायती पीक शेवगा आम्हाला ‘अॅग्रोवन’मुळेच मिळाले. त्यानंतर या भाऊरायाच्या साथीने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करतानाच, नवनवीन पिकांची लागवड करत आज आम्ही बागायतदार झालो. आज आमच्या कुटुंबाची एकत्रित १७ एकर शेती आहे.

या शेतीत आम्ही डाळिंब, सीताफळ, पेरू, खरबूज, जांभूळ ते पॅशन फ्रूट पर्यंत अनेक फळपिके आम्ही पिकवली आहेत. पिकांची निवड करताना आम्हाला ‘अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनाची देखील मदत झाली आहे. मुलगा कृषी पदवीधर झाला असून त्याने जांभुळाची नर्सरी सुरू केली आहे. या सर्व वाटचालीत सोबती असलेल्या ‘अग्रोवन’ला कधी विसरूच शकत नाही. ‘अॅग्रोवन’च्या रूपाने मला सच्चा भाऊ लाभला आहे.’’

Agrowon Newspaper
Agriculture Festival : परळीत उद्यापासून कृषी महोत्सव

माणिक बरळ म्हणाले की, आमच्या कुटुंबियांचे जीवन बदलणारा ‘अॅग्रोवन’ हा आमचा श्वास झाला आहे. त्यातून सुधारित तंत्रज्ञान, शेतीशी निगडीत माहिती आमच्या बांधावर, हातात उपलब्ध झाली. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रयोग आम्हाला समजतात. त्यातून प्रेरणा घेत आम्ही सुधारित वाणांची पिके घेत आहोत. शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी ‘अॅग्रोवन’ने उल्लेखनीय काम केले आहे.

‘अॅग्रोवन’ हाच आमचा खरा पाठीराखा आहे. आमचे कुटुंब ‘अॅग्रोवन’ला कधीच विसरणार नाही. आज रक्षाबंधन असल्याने या भाऊरायाची पूजा करून राखी बांधली. माझ्या संग्रही असणाऱ्या अंकाची पूजा करून सुख दुःखात खंबीरपणे पाठीशी राहावे, अशी प्रार्थना केली.
शुभांगी माणिक बरळ, कचरवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com