Agriculture Mortgage Scheme : लासलगाव बाजार समितीत शेतीमाल तारण कर्ज योजना सुरू

Lasalgaon APMC : बाजार समितीने २०२४-२५ या हंगामाकरिता मका, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी व करडई या प्रमुख शेतीमालासाठी तारण कर्ज योजना राबविणार आहे.
Laslgaon APMC
Laslgaon APMC Agrowon
Published on
Updated on

Nashik News : निफाड तालुक्यात खरीप हंगामातील मका, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी व करडई काढणीचे काम सुरू झाले असून शेतकरी बांधवांचा सदर शेतीमाल एकावेळी बाजार आवारावर विक्रीस येत असल्यामुळे बाजारभाव कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने दरवर्षीप्रमाणे २०२४- २५ या हंगामाकरिता शेतीमाल तारण कर्ज योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.

बाजार समितीने २०२४-२५ या हंगामाकरिता मका, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी व करडई या प्रमुख शेतीमालासाठी तारण कर्ज योजना राबविणार आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच माल तारणात ठेवला जाणार आहे.

Laslgaon APMC
Agriculture Scheme : फवारणीपंप कमी, अर्जदार अधिक असल्याने लॉटरी काढणार

शासकीय प्रतवारीकार व बाजार समितीचे प्रतवारीकार यांनी संयुक्तरीत्या शिफारस केलेला मका, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी व करडई हा शेतीमाल ज्या दिवशी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात तारण म्हणून ठेवला जाईल.

Laslgaon APMC
Agriculture and Food Processing Scheme : मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद

त्या दिवसाचे सरासरी बाजारभाव किंवा त्या मालाचे किमान आधारभूत दर यापैकी जे कमी असेल ते विचारात घेऊन बाजार समिती वखार महामंडळाचे पावतीप्रमाणे स्वनिधीतून संबंधित शेतकऱ्यास धनादेशाद्वारे रक्कम अदा करणार आहे.

एकूण किमतीच्या ७५ टक्के रक्कम तारण कर्ज म्हणून ६ महिन्यांचे मुदतीने ६ टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार असल्याचेही सभापती क्षीरसागर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com