
Latur Bank News : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मार्चअखेर पीककर्जाची ९८.८६ टक्के वसुली करून नवीन उच्चांक प्रस्थापित केलेला आहे.
जिल्ह्यातील ५८४ विविध कार्यकारी सोसायट्यांपैकी ४७८ सोसायट्यांची १०० टक्के वसुली झाली आहे. बँकेकडून वसुली हंगाम २०२२-२३ साठी १७५० कोटी ५६ लाख वसुलीस पात्र रक्कम आहे, त्यापैकी मार्च-२३ अखेर बँकेने १७३० कोटी ६७ लाख वसुली केलेली आहे.
जिल्हा बँकेमार्फत पतपुरवठा असलेल्या ५८४ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थापैकी ४७८ संस्थांनी १०० टक्के वसुली केली आहे व २३ संस्थांनी १०० टक्के वसुली केलेली आहे. पीककर्ज व्यवसाय करणाऱ्या ११० शाखांपैकी ६१ शाखांनी १०० टक्के वसुली केलेली आहे.
जिल्ह्यात रेणापूर तालुका अव्वलस्थानी
लातूर जिल्ह्यामध्ये १०० टक्के वसुली करून रेणापूर तालुक्याने पहिला, ९९.८५ टक्के वसुली करून लातूर तालुक्याने दुसरा, तर ९९.६८ टक्के वसुली करून जळकोट तालुक्याने तिसरा क्रमांक पटकवला आहे.
विविध तालुक्यांतील वसुली अशी...
निलंगा ९९.४८, देवणी ९९.२९, उदगीर ९९.१५, अहमदपूर ९८.७५, औसा ९८.१०, शिरूर अनंतपाळ ९७.६३, चाकूर ९६.६१ अशी राहिलेली आहे.
विक्रमी वसुली केल्याबद्दल संचालक मंडळाकडून कौतुक
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसुलीचा आलेख चढता ठेवल्याबद्दल बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख, बँकेचे अध्यक्ष तथा लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव व बँकेच्या संचालक मंडळाने समाधान व्यक्त केले.
ता.१३.०४.२०२३ रोजीच्या संचालक मंडळ सभेत बँकस्तरावर १०० टक्के वसुली दिलेल्या सोसायट्यांच्या चेअरमन व गटसचिव यांचे अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.