
Sangli News : जिल्ह्यातील तब्बल ४६ हजार ३६७ शेतकऱ्यांकडे ४८१.४३ कोटींची थकबाकी आहे. जत तालुक्यात (Jat Taluka) सर्वाधिक १२ हजार ४५४ शेतकऱ्यांचे ५१ कोटी ४५ लाख थकीत आहेत.
थकीत कर्जवसुलीसाठी (Loan Recovery) जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एकरकमी परतफेड योजनेसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बॅंकेच्या अधिकाऱ्यांसह तालुका विभागीय अधिकारी, विशेष वसुली अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये जिल्हा बँकेकडून शेतीसह बिगरशेती संस्थांना कर्जपुरवठा केला जातो.
शेतीसह सहकारी संस्थांची कर्जे मोठ्या प्रमाणात थकीत आहेत. बड्या संस्थांच्या थकबाकीमुळे बँकेचा एनपीए वाढला आहे. वाढती थकबाकी कमी करण्यासाठी एकरकमी कर्ज परतफेड, सामूहिक कर्ज परतफेड योजना लागू केली आहे.
या पार्श्वभूमीवर बँकेची वसुलीची मोहीम जोरदार सुरू आहे. त्यादृष्टिने आराखडा तयार करण्यात आला आहे.
तालुकानिहाय थकबाकीची स्थिती
जत-सर्वाधिक १२ हजार ४५४ शेतकऱ्यांकडे ५१.४५ कोटी थकीत, शिराळा-१ हजार ६२२ शेतकऱ्यांकडे ९.३१ कोटी, वाळवा-४ हजार ८१६ शेतकऱ्यांकडे ३४.६१ कोटी, मिरज-६ हजार ९२७ शेतकऱ्यांकडे ७२.६६ कोटी, तासगाव-६ हजार ३७९ शेतकऱ्यांकडे ९६.८० कोटी, खानापूर-१ हजार ६६० शेतकऱ्यांकडे ११.५४ कोटी, आटपाडी-२ हजार ८९५ शेतकऱ्यांकडे ४०.२८ कोटी, पलूस-२ हजार ६८१ शेतकऱ्यांकडे ३२.७२ कोटी, कडेगाव-१ हजार ९६४ शेतकऱ्यांकडे १६.३३ कोटींची थकबाकी आहे.
पीककर्जाच्या थकबाकीवर १५.५० टक्के तर मध्यम कर्ज थकबाकीवर १२.५० टक्के व्याज आकारले जाते. ओटीएस योजनेनंतर्गत कर्ज थकीत झालेल्या दिवसापासून व्याजदरात अनुक्रमे ६.५० टक्के व ८.५० टक्के सवलत देण्यात येत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.