
Nagar News : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये नगर जिल्ह्यातून बारा हजार दोनशे तीस विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्यात जिल्हा परिषदेतील शाळेचे विद्यार्थी अधिक आहेत. पाचवी आणि आठवीचे मिळून १६ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेतून देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारी २०२३ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती. तिचा अंतिम निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला. त्यात जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी चमकले. पूर्व प्राथमिकचे २५६, तर पूर्व माध्यमिकचे २२ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादी आले आहे.
जिल्हा परिषदेतून दिलेल्या माहितीनुसार पूर्व माध्यमिकचा (आठवी) निकाल १६.८७ टक्के लागला. पूर्व उच्च प्राथमिकचा (पाचवी) निकाल २६.९ टक्के लागला. स्वरूप गराडेने (संवत्सर शाळा, कोपरगाव) राज्य गुणवत्ता यादीत सहावा, तर सुशय ताठेने (घाडगे वस्ती, श्रीगोंदा) दहावा क्रमांक पटकावला. पाचवीचे एकूण २५६ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले.
पूर्व माध्यमिकच्या निकालात अकोले तालुक्याचा अवघा ४.९५ टक्के निकाल लागला. नेवासेही ८.७१ टक्क्यांवर आहे. तुलनेने पूर्व उच्च प्राथमिकचा निकाल बऱ्यापैकी होता. ३३ हजार ५८५ प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ५१० विद्यार्थी पात्र ठरले.
पूर्व माध्यमिकला २२ हजार ४७७ विद्यार्थ्यांपैकी अवघे ३ हजार ७२० विद्यार्थी पात्र झाले. खासगी शाळेतील ४२१ व ६३७ विद्यार्थी पात्र झाले. जिल्ह्यात एकूण १ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी दोन्ही विभागात गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. राहुरी तालुक्यातील एकही विद्यार्थी गुणवत्ता यादीत आला नाही.
शिष्यवृत्ती परिषदील पात्र विद्यार्थी
तालुका पाचवी आठवी
अकोले ५७२ ८४
संगमनेर ९०४ ६६
कोपरगाव १४६७ ६६२
जामखेड २७५ १२०
पाथर्डी ५८० १४५
शेवगाव ५७८ २४१
कर्जत ४३७ १४८
पारनेर ५३४ ३८२
नेवासे ५२३ १२२
श्रीरामपूर ५१४ ३२६
राहाता ४०७ ३१५
राहुरी १९३ १५५
श्रीगोंदे ४८८ २०२
नगर ३३१ १६७
मनपा ५५६ ३८५
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.