Shetkari Atmhatya : सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Shetkari Atmhatya News : पुळूजवाडीच्या चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा
Even after government measures Farmer take major step
Even after government measures Farmer take major step

Solapur News : खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन केल्याची घटना कोथाळे (ता. मोहोळ) येथे घडली असून, या प्रकरणी सावकारी करणाऱ्या चौघांवर कामती (बु) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोमनाथ वसंत पवार (वय ३०, रा. कोथाळे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

राजाराम गोरख सलगर, तुकाराम बापू तेरवे, लिंगदेव सलगर व काकासाहेब दशरथ सलगर (सर्व रा. पुळूजवाडी, ता. पंढरपूर) असे गुन्हा नोंद झालेल्या खासगी सावकाराची नावे आहेत.


याबाबत कामती पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की सोमनाथ हा वडील वसंत पवार, पत्नी आश्‍विनी व विराज व स्वरा या दोन मुलांसह शेतीवर उपजीविका करून गावात राहत होता.

दरम्यान २०१९ मध्ये त्याने तुकाराम बापू तेरवे व राजाराम गोरख सलगर यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते.

Even after government measures Farmer take major step
वन विभागाच्या त्रासाला कंटाळून  आत्महत्या केल्याचा आरोप

संबंधितांनी रक्कम व्याजासह रक्कम परत दे म्हणून सतत तगादा लावल्याने सोमनाथ याने काही जमीन विकून अनुक्रमे राजाराम सलगर व तुकाराम तेरवे यांचा संपूर्ण व्यवहार पूर्ण केला होता.

ही बाब २०२० मध्ये कुटुंबीयांना समजली होती. या वेळी राजाराम सलगर व तुकाराम तेरवे यांना अनुक्रमे सात लाख व नऊ लाख रुपये जमीन सोडवून घेत सर्व व्यवहार पूर्ण केला होता.

दरम्यान, २५ मे २०२३ रोजी राजाराम सलगर, लिंगदेव कृष्णा सलगर, काकासाहेब दशरथ सलगर यांनी पुन्हा सोमनाथ याला कोथाळे येथे त्याच्या घरी येऊन तुझ्याकडे आमचे आणखी पैसे आहेत, कधी देणार असे म्हणत शिविगाळ, दमदाटी केली.

Even after government measures Farmer take major step
Farmer Suicide : कर्जबाजारी, नापिकीला कंटाळून १८१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

या घटनेच्या आदल्या दिवशी ही गावातील डेअरीसमोर सोमनाथचा मुलगा विराज याच्यासमोर ही शिविगाळ करीत पैसे दे म्हणून दमदाटी केली होती. या घटनेमुळे सोमनाथ याला मानसिक धक्का बसल्याने त्याने २६ मे रोजी कीटकनाशक प्राशन केले.

पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांना हाक देऊन जागे केले. या वेळी त्याच्या वडिलांनी शेजाऱ्यांच्या मदतीने सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, प्रवासात त्याने आपल्या वडिलांना व सोबतच्या लोकांना वरील चौघांनी पैसे देऊन ही आणखी पैसे देण्यासाठी लावलेला तगादा, केलेली शिविगाळ व दमदाटी यामुळे मानसिक त्रास झाल्याने आपण हा प्रकार केल्याचे सांगितले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.


सदर घटनेची त्याचे वडील वसंत ब्रह्मदेव पवार (वय ६५) यांनी कामती पोलिसांत फिर्याद दिली आहे. कामती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुखदेव गोदे करीत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com