Agriculture Marketing : घरपोच विपणनाची साखळी व्हावी

Processing Industry : घरपोच शेतीमाल आणि शेतीमाल प्रक्रिया पदार्थ पोहोचविण्याची सुनियोजित साखळी निर्माण झाली, तर शेती व शेतकरी चांगल्या नफ्यात येतील.
Sunil Chavan
Sunil Chavan Agrowon

Pune News : घरपोच शेतीमाल आणि शेतीमाल प्रक्रिया पदार्थ पोहोचविण्याची सुनियोजित साखळी निर्माण झाली, तर शेती व शेतकरी चांगल्या नफ्यात येतील. त्यासाठी व्यवस्थापन शास्त्र मुळात ज्यांच्या अंगी असते, अशा महिला शेतकऱ्यांना व युवकांना या विपणन साखळीत उतरून विक्री तंत्र विकसित करावे लागेल. मग शेतीतील यश इतर कुठल्याही उद्योगापेक्षा भारी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी येथे केले.

कृषी विभागाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) मार्फत व जागतिक बँकेच्या अर्थसाह्यातून साकारलेल्या झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील पुरंदर लक्ष्मी शेतकरी महिला उत्पादक कंपनीच्या सुमारे १ कोटी ६३ लाख ५४ हजार रुपये खर्चाच्या शेतीमाल प्रक्रिया प्रकल्पाचे उद्‌घाटन शनिवारी (ता. २६) कृषी आयुक्त चव्हाण यांच्या हस्ते झाले.

Sunil Chavan
Agricultural Marketing : सहकारी संस्था बळकटीकरणाद्वारे पर्यायी बाजार व्यवस्था निर्मिती

या वेळी माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे, कृषी संचालक (प्रशिक्षण व विस्तार) दिलीप झेंडे, बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक विजय कांबळे, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवडी, स्मार्टचे अतिरिक्त प्रकल्प संचालक ज्ञानेश्‍वर बोटे, कृषी उपसंचालक सुनील बोरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, हेल्पो फाउंडेशनाच्या सचिव निशाद सलाम, पुनम खटावकर, पुरंदर तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, शेखर कांबळे, आश्‍विनी भोसले, पुरंदर लक्ष्मी शेतकरी महिला उत्पादक कंपनीच्या अध्यक्षा संगीता झेंडे, सचिव स्नेहल खटाटे, संयोजक विठ्ठल झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Sunil Chavan
Agriculture Market : टोमॅटो अन् डाळींचे भाव पाडण्यासाठी केंद्राचा आटापीटा

या वेळी झेंडे म्हणाले, ‘‘शेतीमाल उत्पादकाला म्हणजेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाचे बाजारभाव ठरविण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. तरच शेतीला चांगले दिवस येणार नाहीत. यासाठी शेतीमालावर प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन होणे गरजेचे आहे. तरच आपण आपल्या शेतीमालाचे दर स्वतः ठरवू शकतो.’’

कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे म्हणाले, की आतापर्यंत राज्यात ‘स्मार्ट’च्या माध्यमातून १३४ असे प्रकल्प आमच्या यंत्रणेने मार्गी लावले. पैकी शंभर प्रकल्पांना बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक विजय कांबळे यांनी अर्थसाह्य दिले. त्यामुळे योजनेला बळ मिळत आहे.

कार्यक्रमात प्रकल्पाच्या उद्‍घाटनानंतर प्रास्ताविक कंपनीच्या संचालिका संगीता जांभळे यांनी केले. सचिव स्नेहल खटाटे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. दीपक जांभळे यांनी केले. पूजा झेंडे यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com