विषबाधेप्रकरणी स्वित्झर्लंड सरकार देणार कायदेशीर मदत

अतिघातक रसायनांमुळेच अंगात विष भिनल्याने आमच्या पतीचा मृत्यू झाला. परिणामी, सिंजेटा कंपनीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी विधवांनी केली होती.
Pesticide
Pesticide Agrowon

यवतमाळ : अतिघातक रसायनांमुळेच अंगात विष भिनल्याने (Poisoning Due To Pesticide) आमच्या पतीचा मृत्यू झाला. परिणामी, सिंजेटा कंपनीने (Syngenta Pesticide) भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी विधवांनी (Farmer Widow) केली होती. त्याकरिता स्वित्झर्लंड येथील न्यायालयात (Swiss Court) दावा दाखल करण्यात आला. आता स्वित्झर्लंड सरकारने या दाव्याचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pesticide
Pesticide : कीडनाशकांच्या वापरासंदर्भात जागरूकता आवश्यक

यवतमाळ जिल्ह्यात २०१७ मध्ये कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्याच्या नियंत्रणासाठी शिफारस नसताना एकाहून अधिक कीटकनाशकके एकमेकांत मिसळून फवारणी करण्यात आली. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना विषबाधा झाली. यामध्ये २३ शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. अतिजहाल श्रेणीतील ‘सिंजेंटा’च्या ‘पोलो’ या ब्रँडचा वापर शेतकऱ्यांनी फवारणीसाठी केला. यातील घटक कपाशीसाठी शिफारशीत नाहीत. मात्र तरीही त्याचा वापर करण्यात आला.

Pesticide
Soybean : सोयाबीन आणि युरियाची मात्रा

दोन शेतकरी विधवांसह अन्य एकाने सिजेंटा कंपनी विरोधात स्वित्झर्लंडमधील बासेल येथे न्यायालयीन दावा दाखल केला. त्याद्वारे भरपाईची मागणी केली. या तीनही फिर्यादींना ॲग्रो केमिकल कंपनी सिंजेंटा विरुद्ध स्वित्झर्लंडमध्ये त्यांच्या केसचा पाठपुरावा करण्यासाठी कायदेशीर मदत दिली जाईल. सिंजेंटा मात्र जबाबदारी नाकारत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी घेतलेल्या पोलिस नोंदीनुसार विषबाधांच्या ९६ प्रकरणांपैकी ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला, ते पोलो नावांच्या सिंजेंटाच्या कीटकनाशकाशी संबंधित होते.

तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असा हा दावा स्वित्झर्लंड न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने देखील तो दाखल करून घेतला आहे. पोलो या कीटकनाशकाला पर्यावरणवादी स्वित्झर्लंडमध्ये बंदी आहे. भारतात मात्र सरकारने याला परवानगी दिली आहे.
देवानंद पवार, निमंत्रक, महाराष्ट्र विषबाधित व्यक्ती संघटना
कॅलिफोर्नियातील जॉन्सन नामक व्यक्तीला कॅन्सर झाला होता. ग्लायफोटेचा वापर केल्यामुळे कॅन्सर झाला हे त्याने आरोग्यविषयक अहवालाच्या आधारे कोर्टासमोर सिद्ध केले. त्यामुळे दोन हजार कोटींचा दावा मंजूर करण्यात आला. अशाच प्रकारचे तथ्य या प्रकरणात देखील संकलित करण्यात आले आहेत. न्यायालयीन दाव्याचा खर्च तेथील सरकार करणार असल्यामुळे हा या प्रकरणाचा मोठा विजय आहे.
नरसिम्हा रेड्डी, संघटक, पेस्टिसाइड असोसिएशन नेटवर्क ऑफ इंडिया

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com