

जळगाव : घरकुल प्रकरणात (Gharkul Scheme) नियमित जामीन मिळाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर माजी मंत्री सुरेश जैन (Suresh Jain) मुंबई येथून जळगावात दाखल झाले. बुधवारी (ता.१४) रात्री पावणेनऊला राजधानी एक्स्प्रेसने जळगाव रेल्वे स्थानकावर त्यांचे आगमन होताच चाहत्यांनी त्यांचे ढोलताशे वाजवून व फुले उधळून स्वागत केले.
जैन यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. काही जणांनी त्यांना उचलून घेतले आणि त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले. रेल्वे स्थानकापासून तर थेट बाहेरच्या गेटपर्यंत लाल कारपेट टाकले होते. त्यांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानीही नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. महापौर जयश्री महाजन यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, माजी नगरसेवक करीम सालार, माजी आमदार मनीष जैन, आजी-माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरेश जैन म्हणाले, ‘‘जळगावकरांचे प्रेम पाहून माझ्याकडे शब्द नाहीत. मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. मात्र असे स्वागत आणि एवढी गर्दी मी अनुभवली नाही. मी घरी आल्यानंतर देवाचे दर्शन घेतले. माताजींचा आशीर्वाद घेतला आणि ‘जळगावकरांचे भले होवो’, हीच इच्छा व्यक्त केली. मी अद्याप राजकारणात सक्रिय होण्याचा विचार केलेला नाही.’’
‘जळगावच्या विकासाकडे लक्ष देऊ’
जैन म्हणाले, ‘‘आपण चांगले काम केले आहे. मात्र दुर्दैवाने सध्या जळगाव खड्ड्यांचे शहर आहे, असे म्हटले जाते. त्या वेळी वाईट वाटते. आता आपण विकासाकडे लक्ष देऊ. विकास काही जादूची कांडी नाही. मात्र तो निश्चित होईल. राजकारणात येण्यास आपल्याला घरच्यांचा विरोध आहे. मात्र आपण त्यांच्याशी चर्चा करून पुढे काय ते ठरवू.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.